शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाच्या विरोधात लढा देणे म्हणजे ‘जिहाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:50 IST

अकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय  आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक  आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा  देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य  असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे  कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने  इस्लाम समजून घेतला, तो कधीच समाजविरोधी वर्तन करीत  नाही, असे मत प्रा.शम्सुद्दीन तांबोळी (पुणे) यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय  आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक  आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा  देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य  असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे  कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने  इस्लाम समजून घेतला, तो कधीच समाजविरोधी वर्तन करीत  नाही, असे मत प्रा.शम्सुद्दीन तांबोळी (पुणे) यांनी व्यक्त केले.प्रमिलाताई ओक सभागृह येथे बुधवारपासून नवरात्र व्या ख्यानमालेला प्रारंभ झाला. बाबूजी देशमुख वाचनालयाच्याव तीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.तांबोळी  यांनी गुंफले. ‘मुस्लीम समाज-प्रतिमा, वास्तव, सुधारणा’ या  विषयावर प्रा.तांबोळी यांनी विचार व्यक्त केले. आधुनिक दृष्टी  आणि सत्यशोधक वृत्ती असलेल्या हमीद दलवाई यांच्या  ‘मुस्लीम सत्यशोधक समाजाचा’ वैचारिक वारसा प्रा.तांबोळी  चालवित आहेत. प्रा.तांबोळी पुढे म्हणाले, की जिहाद हा दोन प्रकारचा असतो.  एक अल-ए-अकबर आणि दुसरा अल-ए-असगर. अल-ए- अकबर हा श्रेष्ठ दर्जाचा असतो. आणि अल-ए-असगर हा  दुय्यम दर्जाचा. अल-ए-अकबर प्रकार अहिंसा करणे शिकवि तो. शांततेत स्वत:च्या विरोधात लढा यामध्ये दिला जातो. प्रत्येक  माणसात षडरिपू असतात. ते बाजूला सारू न आत्मशुद्धी करणे  म्हणजे अल-ए-अकबर जिहाद. सच्चा मुसलमान, सज्जन  मुस्लमान तयार होणे किंवा करणे यामध्ये अपेक्षित असते.  अल-ए-असगर यामध्ये रक्तपात, हिंसा करण्याची परवानगी  दिलेली आहे. तुमच्या आणि अल्लाच्या मधात जर कोणी येत  असेल, तर स्वरक्षणासाठी आणि अन्याय होत असेल, तर  अन्याच्या विरोधात शस्त्र उगारण्याची परवानगी यामध्ये दिली  आहे; परंतु आजच्या काही जिहादी संघटनांनी याचा पूर्णपणे अ र्थ समजून न घेतल्याने आत्मघातकी, हिंसक घटना घडवितात,  ज्या इस्लाममध्ये सांगितलेल्या आचरणाविरोधात आहे.फतवा याविषयी प्रा.तांबोळी यांनी सांगितले, की फतवा हा  धार्मिक आदेश नसून, तो ज्येष्ठांनी दिलेला सल्ला असतो; मात्र  आजकाल फतव्याला आदेश मानून याविरोधी अनेक आंदोलने  होतात.  इस्लामच्या आचरणात इमामला (जाणकार) एखाद्या  समस्येवर, घटनेवर मत विचारणे. यावर जाणकाराने दिलेला  सल्ला हा फतवा नसतो. परिस्थिती, काळानुरू प हा फतवा मान्य  किंवा अमान्य करण्याचा अधिकारी इस्लाम धर्माने प्रत्येक  नागरिकाला दिला आहे. एखाद्या व्यक्तीने समस्यांचे, प्रश्नांचे  उत्तर शोधताना सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेऊन वागणे, हेच  मो. पैगंबरांना अपेक्षित असते.