शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना न्याय मिळावा यासाठीच लढा!

By admin | Updated: February 6, 2016 02:21 IST

अल्पावधीतच सोशल मीडियाद्वारा प्रसिद्धीच्या झोतात आलेला छोट्या घनश्यामचा मोठा निर्धार.

नीलिमा शिंगणे/ अकोला: पैसा जीवनात कोणीही कमवितो, प्रसिद्धीही मिळवितो, पण आपल्याकडील पैसा व प्रसिद्धीचा उपयोग शेतकर्‍यांना न्याय देण्याकरिता क्वचितच कोणी करीत असेल. मी मला लाभत असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा उपयोग फक्त आणि फक्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याकरिताच करणार असल्याचे मत सध्या अल्पावधीतच सोशल मीडियाद्वारा प्रसिद्धीच्या झोतात आलेला घनश्याम दराडे या चिमुकल्याने शुक्रवारी सायंकाळी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.सध्या व्हॉट्स अँपवर मुरब्बी राजकारण्यासारखे बोलणार्‍या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक मोबाइलधारकहा व्हिडिओ पाहून आश्‍चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. हाच घनश्याम शुक्रवारी अकोल्यात आला होता. घनश्याम दत्तात्रय दराडे असे पूर्ण नाव या मुलाचे आहे. घनश्याम हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार या गावात राहतो. १३ वर्षीय घनश्याम साईकृपा शाळेत आठव्या वर्गात शिकतो. इयत्ता दुसरीला असताना घनश्यामला पोटाच्या विकाराने ग्रासले. या त्रासापायी तो काही वर्षे शिक्षणापासून दूर राहिला असल्याचे घनश्यामची आई अलका दराडे यांनी सांगितले.अगदी दीड-दोन महिन्यांपूर्वी पिंपळगाव येथील एका कार्यक्रमात घनश्याम राजकीय नेत्यांबाबत त्यांच्याच शैलीत बोलला. ही व्हिडिओ क्लिप काकांनी काढली आणि सहज व्हॉट्स अँपवर टाकल्यानंतर लोकं ओळखायला लागल्याचे घनश्यामने सांगितले. आई पाचवा वर्ग, तर वडील दहावी उत्तीर्ण आहेत. घरात शिक्षणाचे वातावरण नाही. टीव्हीवरील बातम्या, गावात होणार्‍या जाहीर सभांमधून नेत्यांसारखे बोलणे शिकलो, असे तो म्हणाला.समवयस्क मुलांसाठी संदेश देत घनश्याम म्हणाला, मी अगदी छोट्या खेडेगावात राहतो. शिक्षणाचीदेखील तेथे सोय नाही. तथापि, आजारातून उठूनही मी शिक्षण घेत आहे. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मला सर्वच खेळ आवडतात. सर्व विषय अभ्यासायला आवडतात, वाचायला आवडतात. भविष्यात मी कलेक्टर होणारच आहे. त्यासाठी मी खूप अभ्यास करणार, असे त्याने सांगितले