शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांपासून शिवनेरी वसतिगृहातील विद्यार्थी अंधारात

By admin | Updated: August 21, 2015 01:13 IST

पीकेव्ही येथील प्रकार; विद्यार्थी करताहेत अंधारात अभ्यास.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील विद्यार्थी मागील पंधरा दिवसांपासून अंधारात राहत आहेत. याबाबत अधिकार्‍यांना सांगितले असता विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यानच्या काळात परीक्षा पार पडली असून, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या उजेडातच अभ्यास करावा लागला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच शहरात मुसळधार पाऊस झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहात मंगळवार ४ ऑगस्ट रोजी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होणार या प्रतीक्षेत विद्यार्थी होते; परंतु दोन ते तीन दिवस उलटून गेल्यावरही वसतिगृहातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे मुख्य वसतिगृह प्रमुख डॉ. आहेरकर यांच्याकडे वारंवार तक्रार केली; परंतु त्यांनी याबाबत विद्यापीठ अभियंत्यांना कळविण्यात यावे, असे सांगितले. विद्यार्थी विद्यापीठाच्या अभियंत्यांकडे गेले असता, तुम्ही महावितरण कार्यालयात तक्रार नोंदवा, असा उपदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. विद्यापीठाच्या अभियंत्यानी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी महावितरण कार्यालयात तक्रार नोंदविण्यासाठी गेले. या ठिकाणी त्यांनी विद्यापीठाचा दोष असल्याचे म्हटले. तसेच येथील विद्युत रोहित्राची समस्या असून, याबाबत महाविद्यालयामार्फत तक्रार नोंदविण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांची परीक्षा झाली; परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या नादात विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून अधिकार्‍यांची कार्यालये फिरावे लागले. रात्रीच्या वेळी मिळालेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी कसाबसा अभ्यास करून परीक्षा दिली. पंधरा दिवसांचा कालावधी ओलांडला असला तरी, अद्यापही वसतिगृहातील वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला नाही. परिणामी विद्यार्थी अंधारातच रात्र काढत असून, विद्यार्थ्यांच्या जीवितासदेखील धोका आहे.