शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या प्रतीक्षाची जग जिंकण्यासाठी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:52 IST

गणिताच्या परीक्षेत प्रतीक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथी आली.

नीलिमा शिंगणे / अकोलाआई जेमतेम बारावी. वडील बी.ए. द्वितीय वर्ष उत्तीर्ण. आर्थिक परिस्थिती नाजूक. अवघ्या घराण्याचा गणित विषयाशी कधीही सूर-ताल जमला नाही. घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना, अकोल्यातील साडेपाच वर्षीय मुलीने ऑलिम्पियाड परीक्षेत गणित विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथेस्थान मिळविले. प्रतीक्षा प्रदीप मोहोड असे या चिमुकलीचे नाव. प्रतीक्षा आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर अवघं जग जिंकण्यासाठी भरारी घेण्यास लहान वयातच सज्ज झाली आहे.प्रतीक्षा आर.डी.जी.पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. डिसेंबर-२0१५ मध्ये सिल्व्हर झोन फाउंडेशन, नवी दिल्लीच्या वतीने इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आली. प्रतीक्षाने गणित आणि इंग्लिश विषयाच्या प्रथमा परीक्षा दिल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २0१६ च्या शेवटच्या आठवड्याला जाहीर झाला. यामध्ये चिमुकल्या प्रतीक्षाने महाराष्ट्रातून प्रथम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथे स्थान प्राप्त केले. शाळेसाठीच नव्हेतर अकोला जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली. गणित विषयात प्रतीक्षाने १00 पैकी १00 गुण मिळविले. इंग्लिशमध्ये ९४ टक्के गुण मिळविले. प्रतीक्षा ही व्ही.एच.बी. कॉलनी, गोरक्षण रोड येथे राहणारे प्रदीप मोहोड व सुरेखा मोहोड यांची मुलगी आहे. प्रतीक्षाचे वडील घरात ज्येष्ठ असल्याने आई-वडील गेल्यानंतर ऐन तारुण्यात घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. लहान चार भावांचा उदरनिर्वाह करण्याकरिता शिक्षण सोडावे लागले. उपजत असलेली संगीतकला घराला आर्थिक आधार मिळवून देऊ लागली. पाचही भाऊ संगीतामध्ये पारंगत असल्याने अकोला संगीतक्षेत्रात मोहोडबंधू नाव अल्पावधीतच गाजले.ह्यम्युझिकल मेलोडीह्ण नावाने आर्केस्ट्रा गाजला. आज हा आर्केस्ट्रा साउंड ऑफ म्युझिक नावाने चालतो. मात्र, कलेचे मोल कवडीमोल. त्यामुळे मोहोड यांची कला जरी श्रीमंत असली तरी आर्थिक परिस्थिती गरीबच राहिली. अशामध्ये मुलीलाच वंशाचा दिवा मानणारे मोहोड दाम्पत्यांनी आपल्या कन्येला कोणत्याही परिस्थितीत उच्चदर्जाचे शिक्षण देण्याचे ठरविले. प्रतीक्षादेखील आपल्या अंगी असलेल्या गायन कलेला तर जोपासतेच, त्यासोबतच मनाच्या एकाग्रतेने अभ्यास करते. सध्या बालजगताला काटरूनचे वेड लागलेलं आहे. मात्र, प्रतीक्षा यासर्वांपेक्षा वेगळी आहे.