शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:17 IST

महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या प्रभागातील मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब घेतल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच खुल्या व ओबीसी प्रवर्गातील इच्छुक महिला उमेदवारांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी यंदाचे महापौरपद सहज पदरात पडेल, याबद्दल खुद्द भाजपाच्याच गोटातून साशंकता व्यक्त केली जात आहे. अकोला पूर्व तसेच अकोला पश्चिम मतदारसंघाचा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर मतांचे समीकरण नेमके बिघडले कोठे, या विचाराने पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या प्रभागातील मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब घेतल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेनंतर एप्रिल २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने घवघवीत यश मिळवित केंद्रात एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातही भाजपाने ‘शतप्रतिशत’चा नारा दिला. जिल्ह्यात गत २५ वर्षांपासून काँग्रेसची झालेली पीछेहाट अद्यापही कायम आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने विजयश्री प्राप्त केल्यामुळे यंदाही निवडणुकीत विजय पक्काच, असा उमेदवारांचा दावा होता. सुज्ञ मतदारराजाने उमेदवारांचे सर्व अंदाज चुकवत विजयाची माळ गळ्यात घालण्यासाठी अक्षरश: अंतिम फेरीपर्यंत झुलवत ठेवल्याचे चित्र समोर आले. अकोला पूर्व तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातील उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा कयास लावल्या जात होता. निकालानंतर उमेदवारांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मतांचे समीकरण बिघडले कसे आणि त्याला जबाबदार कोण, याचा शोध घेताना पक्षाचा कस लागत असल्याचे बोलल्या जात आहे. अशा स्थितीत महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आणि पुन्हा एकदा भाजपात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे.

..तर महापौर पदाचा दावा कसा करणार?निवडणूक कोणतीही असो, जाती-पातीच्या समीकरणांना केंद्रस्थानी ठेवूनच सर्व राजकीय खेळ्या केल्या जातात. नगसेविकांच्या प्रभागात विधानसभा निवडणुकीत नेमके मतदान झाले किती, याची आकडेवारी तपासल्यानंतर महापौर पदाचा दावा कसा करता येईल, याकडेही इतर इच्छुक नगरसेविकांचे लक्ष लागले आहे.

प्रभागनिहाय मतदानाची माहिती जमाविधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातून अपेक्षित यश मिळू शकले नसल्याची उमेदवारांना खंत आहे. पक्षांतर्गत विरोधक, नाराज बुथ प्रमुख व सुस्तावलेल्या नगरसेवकांनी मतदानाच्या दिवशी कोणते दिवे लावले, याबद्दल माहिती घेण्याच्या उद्देशातून प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रावरील खोलीनिहाय मतदानाची माहिती जमा करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका