महालक्ष्मी अर्थात गौराईंचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. आज घराघरात महालक्ष्मींच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेतही गर्दी उसळली आहे. मुखवट्यांची सजावट आणि नवीन मुखवटे खरेदीसाठी मूर्तिकारांकडेही गर्दी दिसून येत आहे. हा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक पिढीत महालक्ष्मींना स्थापन करण्याची वैविध्यता बदलत गेली आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो; मात्र साधने नवीन असली तरी आस्था व ङ्म्रद्धा तितकीच कायम असल्याचे दिसून येते. महालक्ष्मींच्या जेवणाचा दिवस हा घराघरातील आनंद, उत्साह व मांगल्याचा दिवस असतो. जवळपास विविध प्रकारच्या भाज्या, मिष्टान्नांचा नैवद्य तयार केला जातो. प्रसाद घेण्यासाठीची आमंत्रणे कितीही असली तरी प्रत्येक जण आमंत्रण स्वीकारून महालक्ष्मींच्या दर्शनासाठी तरी हजेरी लावतोच, एवढे महत्त्व महालक्ष्मी अर्थात गौराईच्या सणाला आहे. गणपतींच्या पाठोपाठ गौरींचे वेध लागतात. पश्चिम वर्हाडात तर जवळपास घरोघरी गौरींची अर्थात महालक्ष्मींची स्थापना केली जाते. उद्या २ सप्टेंबर रोजी गौरींची स्थापना होणार असून, ३ ला पूजा व ४ सप्टेंबरला विसर्जन केले जाणार आहे. या तीन दिवसांच्या उत्सवासाठी सध्या बाजारपेठ सजली असून, घराघरात मखर तयार झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक मूर्तिकारांकडे गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम करीत असतानाच गौराईचे मुखवटे घडविण्याचे कामही हातावेगळे केले आहे. काही ठिकाणी मुखवट्यांसोबतच संपूर्ण मूर्तीही तयार केली जाते; मात्र सर्वाधिक मागणी ही मुखवट्यांनाच आहे.
** उत्सव मांगल्याचा
वण महिन्यापासून सुरू झालेल्या व्रत वैकल्य व सणांच्या श्रृंखलेत भाद्रपदातील गौराईंचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून वर्हाडात साजरा केला जातो. आजपासून तीन दिवस या सणाची लगबग घराघरात दिसून येणार आहे.
** फुलांच्या किमती वाढल्या
गणेशोत्सव व महालक्ष्मी उत्सवादरम्यान फुलांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. महालक्ष्मींच्या पूजनासाठी फुले, हार यांचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक घरातून फुलांची मागणी होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फुलांना फटका बसला असल्याने त्याचाही भाववाढीवर परिणाम झाला आहे. गुलाब, मोगरा, झेंडू, अशा अनेक प्रकारची फुले सध्या बुलडाण्याच्या बाजारात उपलब्ध आहेत. सध्या फुलावाल्यांकडे महालक्ष्मींच्या पूजनाच्या दिवशी लागणार्या हार व फुलांची सर्व ऑर्डर आधीच बुक करण्यात आलेल्या आहेत.