शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यग्रस्त शेतक-यांनी केला फळबागांचा अंत्यविधी!

By admin | Updated: June 1, 2016 01:16 IST

वाशिम जिल्ह्यातील संतप्त शेतकर्‍यांनी जाळली झाडे: प्रशासनाविरुद्ध रोष

वाशिम: प्रशासकीय अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या दप्तर दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या दुबळवेल येथील शेतकर्‍यांनी ३१ मे रोजी संत्र्याची झाडे जाळून अंत्यविधी केला. याकरिता जिल्हय़ातील सर्व अधिकार्‍यांना पत्र देऊन बोलाविण्यात आले होते; मात्र एकही अधिकारी उपस्थित झाला नाही. मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील शेतकर्‍यांना फळबाग व पीक विम्यासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३१ मे रोजी दुपारी शेतातील संत्र्याची सुकलेली झाडे तोडून ती जाळून टाकली. यावेळी सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्‍वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे यांची उपस्थिती होती. दुबळवेल येथील गट नंबर २१, २८, ५१ व ९४ मध्ये गत सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले; मात्र कृषी अधिकार्‍यांनी विमा काढला नाही. अवर्षण व सिंचन सुविधांचा अभाव असल्यामुळे फळबागा पूर्णत: सुकल्या. अखेर शेतकर्‍यांना कुठलाही आधार न मिळाल्याने त्यांनी सुकलेल्या फळबागांचा अंत्यविधी केला.