शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात जुने शहरातील महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:30 IST

अकोला : अकोला शहर उपविभागांतर्गत येणार्‍या जुने शहरातही दररोज सहा ते आठ तास भारनियमन होत असून, त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावरही होत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके व नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मोर्चा काढून आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात आपल्या व्यथा मांडल्या. 

ठळक मुद्देआमदार बाजोरियांकडे मांडल्या व्यथा भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहर उपविभागांतर्गत येणार्‍या जुने शहरातही दररोज सहा ते आठ तास भारनियमन होत असून, त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावरही होत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके व नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मोर्चा काढून आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात आपल्या व्यथा मांडल्या. कोळशाचा तुटवडा आणि बेताल नियोजनामुळे महावितरणवर सध्या राज्यभर भारनियमन करण्याची नामुष्की ओढवली आहे. महावितरणच्या अकोला मंडळातही सर्वच फिडरवर ‘ग्रुप’निहाय शहरी व ग्रामीण भागात किमान सहा ते सव्वानऊ तास वीज गायब राहत आहे. जिल्हय़ातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, जी १, जी २ व जी ३ या ग्रुपनुसार भारनियमनाचे तास ठरविण्यात आले आहे. याचा फटका प्रामुख्याने ग्रामीण भागाला बसत असला, तर जुने शहरातील अनेक भागातही आठ ते सहा तास वीज गायब राहत आहे. सणासुदीच्या काळात तासन्तास वीज गायब राहत असल्याने नागरिकांमध्ये रोषाची भावना आहे. वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे पाणीपुरवठय़ावरही त्याचा परिणाम होत आहे. शहरात सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी पुरवठय़ाच्या वेळेतच वीज गायब राहत असल्याने नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शुक्रवारी आमदार गोपीकिशन यांचे कार्यालय गाठून त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. पाणीपुरवठय़ाच्या वेळेत भारनियमन होऊ नये, अशी रास्त मागणी महिलांनी लावून धरली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार बाजोरिया यांनी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके व शहर विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मानकर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी त्यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून महावितरणच्या अधिकार्‍यांशी त्यांचे बोलणे करून दिले. भारनियमनाची वेळ बदलून देण्यासंदर्भात महावितरण मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना यावेळी ऊर्जामंत्र्यांनी अधिकार्‍यांना केल्या.  मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी अतुल पवनीकर, सागर भारुका, नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

चक्क सहा ते आठ तास अघोषित भारनियमनामुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. मोर्चेकरी महिला व महावितरणच्या अधिकार्‍यांसमक्ष ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. महिला वर्गाला होणारा त्रास लक्षात घेता भारनियमनाच्या वेळेत बदल करण्यासोबतच संपूर्ण शहरात एकाच वेळी भारनियमन करण्याची मागणी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. महावितरणने वेळेत बदल न केल्यास आंदोलनाचा मार्ग खुला आहे. - गोपीकिशन बाजोरिया, आमदार