अकोला: रुग्णसेवा ही मानवसेवा आहे. शुश्रूषेच्या माध्यमातून रुग्णांना स्वस्थ करण्याचा संकल्प येथील भावी परिचारिकांनी मंगळवार, १२ मे रोजी परिचारिका दिनाच्या औचित्यावर केला. स्थानिक भगीरथवाडीत परिसरातील नर्सिंग शिक्षण संस्थेच्या नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी परिचारिका दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी रुग्ण सेवेची सामूहिक शपथ घेतली. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी महापौर मदन भरगड, संस्थेच्या अध्यक्ष मीना माहोरे, प्राचार्य विशाखा गणवीर आदींची उपस्थिती होती. मुलींनी या क्षेत्रात पदार्पण करून या क्षेत्राला नवा सन्मान मिळवून दिला, असे प्रतिपादन उज्ज्वला देशमुख यांनी केले. मदन भरगड यांनी भावी परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. संचालन गणवीर, तर आभार प्रदर्शन ज्योती गायकवाड यांनी केले. याप्रसंगी मनोहर माहोरे, महेंद्र जैन, स्वप्निल माहोरे, राजेश कळमशेरे आदी उपस्थित होते.
भावी परिचारिकांनी घेतली सेवेची शपथ
By admin | Updated: May 15, 2015 01:40 IST