शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही... १२ जणांचा मृत्यू, ३६८ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,२२२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,२२२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अमाखाँ.......... प्लॉट व मोठी उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, गीता नगर, पारस कॉलनी व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, बार्शीटाकळी, राम नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी चार, पिंजर, कोलोरी, रणपिसे नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, बोरगाव मंजू, बाळापूर, अकोट, ख्रिरपूर.........., शिवार, जठारपेठ, देवकी नगर व हरिहर पेठ येथील प्रत्येकी दोन, हिंगणा, गोकूल कॉलनी, न्यू बस स्टँड, लक्ष्मी नगर, गड्डम प्लॉट, वणी रंभापूर, देशमुख फैल, सोपीनाथ नगर, शिवाजी नगर, पार्वती नगर, निंभोरा, पैलपाडा, देगाव, दहिहांडा, तेल्हारा, पातूर, मांडोली, कंळबा ता. बाळापूर, हसनापूर, गोकूल कॉलनी, खामखेड, पारस, शेलद, राजीव गांधी नगर, रिंग रोड, दानोरी ता. अकोट, राधेनगर, गौतम रोड, सिंधी कॅम्प, रतनलाल प्लॉट, लहान उमरी, तेल्हारा, जवाहर नगर, व्याळा ता. बाळापूर, वर्धमान नगर, मातानगर, शिवनी, महाकाली नगर, शिवसेना वसाहत, गोपालखेड, वाडेगाव, रामदासपेठ व विराहित येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी मुर्तिजापूर येथील ११, बार्शीटाकळी येथील नऊ, कौलखेड येथील सात, मलकापूर येथील पाच, खडकी येथील चार, राऊतवाडी, मोठी उमरी व पिंजर येथील प्रत्येकी तीन, बहादुरा, रामदासपेठ, डाबकी रोड, जवाहर नगर, बलवंत कॉलनी, खदान व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, नया अंदुरा, खेडकर नगर, आपातापा रोड, निबंधे प्लॉट, जपान जीन, अनिकट, अगरवेस, माळीपुरा, तार फैल, रिगल टॉकीज, अंबिका नगर, जुने शहर, विजय नगर, सिंधी कॅम्प, तेल्हारा, निमवाडी, रिंग रोड, लेडी हार्डिंग रोड, पीकेव्ही, शिवार, आरटीओ रोड, हरिहर पेठ, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, कीर्ती नगर, गिरी नगर, नर्सिंग होस्टेल, तरोडी, जीएमसी, आळसी प्लॉट, रतनलाल प्लॉट, हिंगणा फाटा, नफेवाडी, वाडेगाव ता. बाळापूर व धानेगाव ता. बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पाच महिला, सात पुरुषांचा मृत्यू

हमजा प्लॉट, जुने शहर येथील ४४ वर्षीय महिला, नायगाव येथील ४० वर्षीय महिला, आळसी प्लॉट येथील ६५ वर्षीय महिला, पारस येथील ४२ वर्षीय पुरुष, शास्त्री नगर येथील ८१ वर्षीय पुरुष, भरतपूर ता. बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष, शिवसेना वसाहत येथील ५८ वर्षीय पुरुष, खदान येथील ७४ वर्षीय पुरुष व दगडपारवा येथील ३६ वर्षीय पुरुष अशा नऊ रुग्णांचा मंगळवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सायंकाळी खासगी रुग्णालयातून तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला व कोठारी वाटिका नं. ८ येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

३३० जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, देवसार हॉस्पिटल येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथील एक, ॲक्विन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, हैदर उम्मत हॉस्पिटल येथील तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, ओझोन हॉस्पिटल येथील १०, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, युनिक हॉस्पिटल येथील एक, बाॅईज होस्टेल दोन, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील तीन, अवघाते हॉस्पिटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, अकोला ॲक्सिडेंट येथील चार, तर होम आयसोलेशन येथील २२८, अशा एकूण ३३० जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

३,७७३ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,३९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २७,०९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.