शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फेसबुक प्रेमाने केला घोर!

By admin | Updated: June 4, 2016 02:14 IST

शिक्षिकेचा लैंगिक छळ करणा-यांना पोलीस कोठडी

अकोला: फेसबुक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून झालेल्या प्रेमप्रकरणानंतर प्रियकराने प्रेयसी शिक्षिकेला पेस्ट्रीतून गुंगीचे औषध देऊन तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खदान पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपींस अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका २७ वर्षीय शिक्षिकेची फेसबुक सोशल नेटवर्किंंगच्या माध्यमातून कोठारी कॉन्व्हेंटजवळ राहणारा दीपक महावीर शर्मा याच्यासोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दीपक शर्मा हा बोरगाव मंजू येथील अग्रसेन बँकेत कार्यरत आहे. भेटीगाठी सुरू झाल्या. आरोपी दीपक शर्मा याने शिक्षिकेला शरीरसुखाची मागणी केली; परंतु शिक्षिकेने त्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने शिक्षिकेला पेस्ट्रीतून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून शिक्षिकेचे नग्न फोटो काढल्याचा धक्कादायक आरोप शिक्षिकेने केला आहे.शिक्षिकेने तिच्या अत्याचाराबाबत आरोपीची आई रेखा महावीर शर्मा हिला सांगितले असता, तिने शिक्षिकेला जातीवाचक शिवीगाळ केली आकाश महावीर शर्मा, आशीष महावीर शर्मा यांनी शिक्षिकेचे हात पकडून तिचा विनयभंग केला. शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपी दीपक महावीर शर्मा, त्याची आई रेखा शर्मा, भाऊ आकाश व आशीष शर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३५४, ३२३(३४) नुसार गुन्हा दाखल केला.