शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच केला मुलाचा खून

By admin | Updated: June 22, 2017 04:39 IST

हेंडज येथील घटना; कांद्याचे कट्टे विकण्यावरून झाला वाद.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर /हातगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान बापाने कुर्‍हाडीने वार करून मुलाचा खून करण्यात झाले. मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथे २१ जूनच्या सकाळी ९.३0 च्या दरम्यान ही घटना घडली. हेंडज शेतशिवारात एका युवकाचा खून झाल्याची माहिती मिळताच ठाणेदार एपीआय नितीन पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. बाळू किसन मसके यांच्या शेतात योगेश बाळू मसके या २३ वर्षीय युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. योगेशचे वडील बाळू यांच्याकडे विचारणा केली असता ते इतरांची नावे सांगू लागले. ठाणेदार पाटील यांनी लगेच अकोल्याहून श्‍वान पथकास पाचारण केले. ४.३0च्या दरम्यान उपनिरीक्षक सुजीत डागरे, हे.काँ. अनिल जगताप व पोलीस नायक तथा श्‍वानाचे प्रथम परीक्षक व नियंत्रक राजीव चौधरी हे हिरा नामक श्‍वानासह घटनास्थळी पोहोचले. योगेशच्या मृतदेहाच्या बाजूला मातीत खुपसून ठेवलेल्या कुर्‍हाडीच्या दांड्याचा वास घेऊन हिरा श्‍वानाने सरळ गर्दीत उभ्या असलेल्या बाळू किसन मसकेचा हात पकडला. त्यानंतर बाळू मसके याने आपणच मुलाचा खून केल्याचे कबूल केले. योगेश नेहमीच दारूच्या व्यसनापायी घरातील धान्य विकायचा, त्यामुळे बाप-लेकात नेहमीच वाद होत असत. बुधवारीदेखील कांद्याचे कट्टे विकण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान सरळ बापाने कुर्‍हाडीचे घाव घालून मुलाची हत्या करण्यात झाले. एसडीपीओंनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंंत सुरू होती. महल्ले, ठाकूर, प्रांजळे, इचे, श्रीकांत बोरोकार यांनी तपासकार्यात मदत केली.