शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडील अल्पभूधारक शेतकरी, अन् मुलगा झाला एमबीबीएस डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST

तेल्हारा : अनेकजण परिस्थितीचे भांडवल करतात. पुढे जायचे होते. परंतु पैसा नव्हता, परिस्थिती नव्हती. अशी कारणे अनेकजण सांगतात. परंतु ...

तेल्हारा : अनेकजण परिस्थितीचे भांडवल करतात. पुढे जायचे होते. परंतु पैसा नव्हता, परिस्थिती नव्हती. अशी कारणे अनेकजण सांगतात. परंतु पुढे जाण्यासाठी, यश मिळविण्यासाठी, स्वप्न साकार करण्यासाठी परिस्थिती, गरिबी, पैसा कधीही आड येत नाही. परिस्थिती कशीही असो, ती बदलता येते, परिश्रम आणि गुणवत्तेने....हेच एका छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने दाखवून दिले आहे. अथक परिश्रमाने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने गावातील पहिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे.

ही यशोगाथा आहे, तेल्हारा तालुक्यातील दापुरा गावच्या प्रवीण सातारकर याची. वडील जगदीश शालिग्राम सातारकर हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांना दोन मुले. आई कविता ही गृहिणी. मोठा भाऊ सचिन हा शेती सांभाळतो. लहान प्रवीण...घरी शेती केवळ पाच एकर. पाच एकर शेतीत होणारे उत्पन्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह. त्यात शेतीत होणारी नापिकी, नैसर्गिक आपत्ती अशी परिस्थिती असतानाही, जगदीश सातारकर यांनी, मुलांना शिक्षण दिले. परिस्थितीशी दोन हात करीत, त्यांनी प्रवीणला डॉक्टर करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रवीणनेसुद्धा त्यांचे परिश्रम, जिद्द सार्थकी ठरविली. मुलगा डॉक्टर झाल्याने, आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. प्रवीण गावातील पहिला एमबीबीएस डॉक्टर झाला. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण मनब्दा येथील श्रीनाथ माध्यमिक विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण तळेगाव बाजार येथील राजीव गांधी महाविद्यालयात व पदवीपर्यंतचे वैद्यकीय शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे झाले. प्रवीणने जिद्द व कठोर परिश्रमाने एमबीबीएसची पदवी घेऊन परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने इंग्रजी विषय घेऊन पदवी संपादन केली.

फोटो:

शेतात काम करून प्रवीणने मिळविले यश

प्रवीणने शेतीची कामे करून व बसने ये-जा करून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात त्याने एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न साकार करीत दापुरा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

डॉक्टर होण्याचे श्रेय आईचे...

प्रविणचे वडील जगदिश शालीग्राम सातारकर अल्पशिक्षित शेतकरी. आई कविता अशिक्षित असली तरी, तिनेच प्रविणची गुणवत्ता ओळखून त्याच्या जीवनाला आकार दिला. दिशा दिली. मुलगा हुशार असल्याने, तो पुढे जावा. मोठा माणूस बनावा. अशी तिची धडपड असायची. एखादी गोष्ट कुटूंबासाठी कमी करायची. काटकसर करायची. परंतु मुलाला काही कमी पडू द्यायची. तिच्या परिश्रमाची, संघर्षाची आज फुले झालीत.