शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकास सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:10 IST

अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका  इसमावर हल्ला करणार्‍या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने  सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास  आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने  सुनावली आहे.

ठळक मुद्देलोहारा येथील घटना११ साक्षीदार तपासले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका  इसमावर हल्ला करणार्‍या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने  सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास  आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने  सुनावली आहे.लोहारा येथील रहिवासी महादेव हिंमतराव तायडे त्यांचे वडील  हिंमतराव तायडे व भाऊ संतोष तायडे यांच्यावर क्षुल्लक  कारणावरून काशीनाथ यशवंत जंजाळ आणि राजेश काशीनाथ  जंजाळ या दोघांनी २९ सप्टेंबर २0१५ रोजी सकाळी कुर्‍हाड व  लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर ज खमी झालेल्या तायडे पिता-पुत्रास तातडीने रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. त्यानंतर जखमी महादेव तायडे यांच्या  तक्रारीवरून उरळ पोलिसांनी काशीनाथ यशवंत जंजाळ आणि  राजेश काशीनाथ जंजाळ या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या  कलम ३0७, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर  प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.  जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने या  प्रकरणात ११ साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही आरोपीविरुद्ध समोर  आलेल्या ठोस पुराव्यावरून कलम ३0७ अन्वये सात वर्षांचा  सश्रम कारावास व प्रत्येकी ५00 रुपये दंड आणि दंड न भरल्यास  आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. कलम ३२४ अन्वये  दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५00 रुपये दंड  ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा  न्यायालयाने जंजाळ पिता-पुत्रास सुनावली.

बाप-लेकाचे वेडसर असल्याचे नाटकया प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी राजेश काशीनाथ जंजाळ  हा वेडसर असल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याची नागपूर येथील  रुग्णालयात तपासणी केली असता तो वेडसर नसल्याचे समोर  आले. त्यानंतर त्याचे वडील काशीनाथ यशवंत जंजाळनेसुद्धा  वेडसर होण्याचे नाटक केले; मात्र त्याचीही तपासणी केल्यानंतर हे  दोघेही वेडसर नसल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. त्यामुळे या  प्रकरणातून वाचण्यासाठी बाप-लेकाने हा आटापिटा केल्याचे  समोर आले.

दुचाकीवर पडल्याने जखमी झाल्याचा आरोपया प्रकरणातील जखमी तायडे कुटुंबीय हे दुचाकीवरून पडल्याने  जखमी झाल्याचा आरोप जंजाळ पिता-पुत्राने केला; मात्र ११  साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने जंजाळ खोटे बोलत  असल्याचे सांगत त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.