शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पित्याने हाकलले, पोलिसांनी पोहोचविले..

By admin | Updated: December 15, 2014 01:17 IST

एका अपंग मुलीची करुण कहाणी

नितीन गव्हाळे/अकोलाआई जिवंत असेपर्यंत पित्याने अपंग मुलीचा सांभाळ केला; परंतु पत्नी गेल्यानंतर पित्याने दुसरे लग्न करून सावत्र आईला घरात आणले. सुरुवातीला सावत्र आईने मुलीच्याप्रती असलेले सर्व कर्तव्य पूर्ण केले; परंतु नंतर अपंग मुलीचा छळ सुरू झाला. पिताही निष्ठूर झाला आणि एक दिवस पोटच्या मुलीलाच त्याने घराबाहेर हाकलून लावले. एका पायाने अधू असलेली ती मुलगी गयावया करून रडली. पिता व सावत्र आईला हात जोडले, विनवण्या केल्या. पण सावत्र आईच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या निष्ठूर पित्याला तिची थोडीही दया आली नाही. अखेर ही मुलगी रविवारी दुपारी पोलीस ठाण्यात न्याय मागायला आली आणि पोलिसांनीही तिच्याविषयी सहानुभूती दाखवित तिला पुन्हा पित्याच्या घरी सोडून दिले. ही करुण कहाणी आहे, एका पायाने अधू असलेल्या दुर्दैवी मुलीची.. शहरातील एका परिसरात ही मुलगी राहते. आई जिवंत असेपर्यंत पित्याने तिचा सांभाळ केला. तिला शिकविले, मोठे केले; परंतु एक दिवस त्या मुलीच्या आईने अचानक या जगाचा निरोप घेतला. तिच्या आईचे जाणे, त्या मुलीसाठी शाप ठरले. पित्याने दुसरे लग्न करून सावत्र आईला घरात आणले. या सावत्र आईचे या मुलीने आनंदाने स्वागत केले. आता हीच आपली आई.. तीच आता आपला आईसारखा सांभाळ करेल.. अशी आशा या मुलीने मनी बाळगली; परंतु तिची ही आशा अल्प काळातच मावळली. या अपंग मुलीवरून तिची सावत्र आई व पित्यामध्ये भांडण होऊ लागले. अखेर पित्याने सावत्र आईसाठी पोटच्या मुलीला घराबाहेर हाकलून लावले. मुलीने माझी चूक तरी काय? मला का बाहेर काढता, असे विचारल्यानंतर निरूत्तर पित्याने तिला घराबाहेर काढले. ऐन तारुण्यात पाऊल टाकलेली ती असहाय मुलगी कोठे जायचे, कुठे राहायचे, या विचारचक्रातच बाहेर पडली.सुरुवातीला ओळखीच्या ठिकाणी, नातेवाईकांकडे तिने कसेबसे दोन ते तीन महिने काढले. त्यांच्याकडे राहायचे तरी किती दिवस? असा प्रश्न तिच्या मनात आला. अन्यायाविरुद्ध आता दाद मागायचीच. या हेतूने ती रविवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आली. पोलिसांना तिने तिची करुण कहाणी सांगितली. पोलिसांना, मला मदत करा हो. अशी विनवणी करू लागली; परंतु पोलीस तिला कायदेशीर मदत करू शकत नव्हते. त्यांनीही त्यांची अडचण तिला सांगितली.