शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला उपचार मिळत नसल्याने पित्याची पोलिसांत तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:36 IST

रुग्ण युवतीच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप पित्याने करीत, शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली.

अकोला : आजारी मुलीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले; परंतु तिला योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे केली; परंतु त्यानंतरही मुलीला व्यवस्थित उपचार मिळाले नाहीत. सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर हे गरीब रुग्ण युवतीच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप पित्याने करीत, शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली.पातूर येथील रहिवासी एका पित्याने त्यांच्या २१ वर्षीय जागृती नामक मुलीला पातूर येथील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये भरती केले होते; परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक- ७ मध्ये भरती करण्यात आले. २४ ते २८ आॅगस्ट या चार दिवसांत मुलीला आराम मिळाला नाही व प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती आणखीनच बिघडत गेली. याबद्दल रुग्णालयातील अधिकाऱ्यांना माहिती दिली; परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे २८ आॅगस्ट रोजी त्यांनी रुग्णालयात उपचारात हलगर्जी करण्यात येत असून, रुग्णांना उपचार मिळत नसल्याची तक्रार अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांच्याकडे केली. त्यांनीही तक्रारीची दखल घेतली नाही. उलट रुग्णालयातील डॉक्टरांनी तक्रार केली म्हणून उपचारामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जी केली आणि त्यांच्या मुलीला उपचारापासून वंचित ठेवले, असा आरोप मुलीच्या वडिलांनी करीत शुक्रवारी दुपारी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी तक्रार दाखल केली. ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला