तहसील कार्यालयाच्या संजय गांधी सभागृहात मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आलेले आहेत. त्यापैकी चौदाव्या क्रमांकाचा टेबल पोस्टल बॅलेट मोजणीकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. शिर्ला, आलेगाव, सस्ती या गावांची मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे एकापेक्षा अधीक एक एकाच केंद्रात मतमोजणी करण्यात येईल,
पहिल्या फेरीमध्ये १४ टेबलवर शिर्ला ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आलेगाव ग्रामपंचायतीची मतमोजणी केली जाणार आहे. चार टेबलवर सस्ती ग्रामपंचायत, त्यानंतरच्या तीन टेबलवर दिग्रस खुर्द, उर्वरित चार टेबलवर विवराची मतमोजणी केली जाणार आहे. मोजणीसाठी १४ टेबलवर १४ पर्यवेक्षक १४ समावेशक आणि मदतीसाठी चौदा कोतवाल असणार आहेत. निवडणुकीचा निकाल १० निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील. यासाठी तहसीलदार दीपक बाजड, निवडणूक नायब तहसीलदार विजय खेडकर जबाबदारी पार पाडणार आहेत.
तहसील कार्यालयाला छावणीचे स्वरूप
मतमोजणी असल्याने तहसील कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, पाच पोलीस अधीकारी, ६५ पोलीस कर्मचारी, २६ होमगार्ड जवान तैनात करण्यात आलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मिरवणूक जल्लोष काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणेदार हरीश गवळी यांनी दिला आहे.