शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फारशी भाषेचा सर्रास केला जातो वापर

By admin | Updated: August 3, 2016 01:39 IST

परवलीचा शब्द बदलता राहतो : ‘समलिंगी’ नागरिकांची साखळी वाढत आहे.

अकोला : 'समलिंगी' नागरिकांमध्ये संवादासाठी वापरली जाणारी भाषा ही दुसर्‍याला सहजासहजी समजत नाही. फारशी भाषेतील अनेक शब्दांची बेमालूमपणे पेरणी करीत मराठी किंवा हिंदीतून अशी मंडळी संवाद साधत असल्याचे समोर आले आहे. कुठलीही मुळाक्षरे न गिरवता या मंडळींनी चक्क फारशी भाषा आत्मसात केली आहे. अकोल्यापासून थेट नांदेडपर्यंत व जळगाव खान्देश, नागपूरपर्यंत सर्रास फारशी भाषेतील अनेक शब्दांचा 'कोड' लग्वेज म्हणून वापर केला जातो. ही भाषा कोणीही कुणाला शिकविली नाही; परंतु सरावाने सर्वांनाच जमली आहे. एखाद्या नव्या समलिंगी सहकार्‍यासोबत संवाद साधताना यामधील ओळखीच्या शब्दाचा वापर आधी केला जातो. सध्या या भाषेमध्ये ह्यसनी लिऑन व सनी देवलह्ण या अभिनेत्यांच्या नावाचाही कोड म्हणून वापर केला जातो. समोरचा समलिंगी कोती आहे की पंथी, हे समजून घेण्यासाठी ह्यसनी लिऑन व सनी देवलह्ण ही नावे वापरून समोरच्याला संकेत दिला जातो.फसवणुकीचेही प्रमाण नाहीसमलिंगी संबंध ठेवतानाही 'स्टेटस्' चा विचार केला जातो. त्यामुळे आपला सहकारी कोण असावा, याची निवड करताना विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे या सर्व प्रकारामध्ये एकमेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारींचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच सहकारी पळविण्याच्या वृत्तीचीही तेवढय़ा गांभीर्याने दखल घेतली जात नाही, हे विशेष! उच्चपदस्थ अधिकार्‍यांचाही समावेश समलिंगी संबंधामध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमवेत सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठितांचाही मोठा समावेश आहे. यांची स्वतंत्र अशी साखळी असून, नव्या सहकार्‍यांना त्यामध्ये सामावून घेण्याआधी काटेकोरपणे काळजी घेतली जाते. महाविद्यालयीन तरुणांना या साखळीमध्ये ओढण्यासाठी मोबाइल, कपडे, उंची दारू किंवा मोठय़ा हॉटेलमध्ये जेवणाचे आमिष दाखविले जाते. यामध्ये सर्व मामला हा स्वखुशीचा असल्याने आमिषाला बळी पडणार्‍यांची संख्या वाढती आहे.