शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपाचा ‘फार्स’च!

By admin | Updated: July 26, 2016 02:07 IST

पेरणी आटोपली: शेतक-यांची मागणीच नाही!

संतोष येलकर/अकोलापीक कर्ज मिळण्यास अपात्र असलेल्या राज्यातील कापूस उत्पादक २१ जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटपाचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला तरी, खरीप पेरणी आटोपल्याने, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मोफत कपाशीच्या बियाण्यांस शेतकर्‍यांकडून मागणी नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटपाचा सरकारचा निर्णय ह्यफार्सह्णच ठरला आहे.सन २0१२-१३ व २0१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची परतफेड केली नसल्याने, सन २0१६ यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळण्यासाठी थकबाकीदार राज्यातील ६ लाख ७१ हजार शेतकरी अपात्र आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक २१ जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांपैकी कपाशीची पेरणी करू न शकलेल्या शेतकर्‍यांना कमाल एक एकराच्या क्षेत्र र्मयादेत कापूस बियाण्याची प्रत्येकी दोन पाकिटे मोफत वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन विभागामार्फत गत ५ जुलै रोजी घेण्यात आला. शासनाचा हा निर्णय ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी,कृषी विभागाच्या कार्यालयांना प्राप्त झाला; परंतु यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्यानंतर मोफत बियाण्याचा निर्णय प्राप्त झाल्याने, मोफत कपाशी बियाण्यासाठी शेतकर्‍यांकडून मागणी नाही. या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करण्याचा सरकारचा हा निर्णय केवळ ह्यफार्सह्णच ठरल्याचे चित्र आहे. अमरावती विभागात बियाणे वाटपास सुरुवातही नाही!शासनाच्या निर्णयानुसार कापूस उत्पादक राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व चंद्रपूर इत्यादी २१ कापूस उत्पादक जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करावयाचे आहे; परंतु खरीप पेरण्या आटोपल्याने, मोफत कपाशी बियाण्यास शेतकर्‍यांकडून मागणी नाही. त्यामुळे अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपास अद्याप सुरुवातही झाली नाही. मोफत बियाणे वाटपासंबंधीचा अहवाल अद्याप अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे विभागात मोफत कपाशी बियाणे वाटप सुरू करण्यात आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.