शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मिळणार नादुरुस्त रोहित्र वाहतुकीचा खर्च!

By admin | Updated: January 22, 2016 01:25 IST

वाहतुकीपोटी येणारा खर्च महावितरणकडून देण्याचे ऊर्जामंत्र्याचे निर्देश.

अतुल जयस्वाल/अकोला : शेतशिवारांमध्ये बसविलेले रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी नेण्याची जबाबदारी महावितरणची असली, तरी अनेकदा शेतकरी स्वत: ते महावितरणच्या जिल्हापातळीवरील दुरुस्ती केंद्रापर्यंत दुरुस्तीसाठी नेतात. या वाहतुकीपोटी येणारा खर्च संबंधित शेतकर्‍यांना महावितरणकडून देण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शेतकर्‍यांना सिंचन करता यावे, यासाठी महावितरणकडून शेतशिवारांमध्ये वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. कृषिपंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा, याकरिता वेगवेगळय़ा क्षमतेची विद्युत रोहित्रे बसविण्यात आली आहेत. शेतकर्‍यांना रब्बी तसेच काही प्रमाणात खरीप हंगामातही सिंचनासाठी कृषिपंप सातत्याने सुरू ठेवावे लागतात. एकाच वेळी सर्व कृषिपंप सुरू राहिल्याने रोहित्रांवरील दाब वाढल्यामुळे ती नादुरुस्त होतात. अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये ऐन हंगामात रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. ऐन हंगामात रोहित्र नादुरुस्त झाल्यास, तातडीने दुरुस्त करून शेतकर्‍यांना अव्याहतपणे विजपुरवठा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे; तथापि या कामात महावितरणकडून दिरंगाई होते. त्यामुळे अनेकदा शेतकरी स्वखर्चाने नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी महावितरणच्या जिल्हास्तरावरील दुरुस्ती केंद्रात नेतात. त्यांना रोहित्राच्या वाहतुकीसाठी येणारा खर्च महावितरणकडून दिला जात नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर नादुरुस्त रोहित्राच्या वाहतुकीसाठी शेतकरी खर्च करत असतील, तर तो खर्च त्यांना महावितरणकडून देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना अकोला व वाशिम जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना दिले. ६३ केव्हीऐवजी बसणार १00 केव्हीचे रोहित्र शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी शेतशिवारांमध्ये बहुतांश ६३ केव्ही क्षमतेची रोहित्रे बसविण्यात आली आहेत. आता यापुढे सदर रोहित्रे नादुरुस्त झाल्यास त्याऐवजी १00 केव्ही क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी १00 केव्हीचे रोहित्र उपलब्ध होऊ शकले नाही, तर त्या ठिकाणी पूर्वीचे ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र दुरुस्त करण्यात येईल व ६३ केव्ही क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.