शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त वीज रोहित्रांमुळे शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी ...

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

बाळापूर येथील काळबाई शेत शिवारातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. काळबाई शिवारातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात कांदा, गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत पिके बहरलेली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. गत पंधरा दिवसांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, अद्यापही दुरुस्ती न केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काळबाई शिवार व तालुक्यातील इतर नादुरुस्त असलेले रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

थकीत वीज बिलांची वसुली

थकीत वीज बील भरल्याशिवाय रोहित्र दुरुस्त न करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवाच्या सव्वा आलेले वीज बिल भरण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील सर्व वीज रोहित्र तात्काळ सुरू करण्याचा आदेश असतानाही बाळापूर उपविभागातील वीज रोहित्रे दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.