शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघर्ष समितीचा बाश्रीटाकळी तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: November 7, 2014 23:11 IST

विविध मागण्यांचे निवेदन सादर, १५00 शेतक-यांचा सहभाग.

बाश्रीटाकळी (अकोला): आपल्या विविध मागण्यांसाठी बाश्रीटाकळी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. समितीचे प्रमुख सुनील धाबेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील सुमारे १५00 शेतकरी उपस्थित होते.यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न धुळीस मिळाले आहे. हजारो रुपये खचरून पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतरही निसर्गाने दगा दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, कपाशी, तूर, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ७१ पैसे आणेवारी चुकीची असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. ही आणेवारी रद्द करण्यासह वीज बिल माफ करणे, पीक कर्ज माफ करणे, कृषी फिडरवर दिवसा भारनियमन न करणे, शेतकर्‍यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत जारी करणे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे, कपाशीची शासकीय खरेदी लवकर सुरू करणे, चारा डेपो सुरू करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करणे आदी न्याय मागण्यांचे निवेदन तहसीलदार एस.एस. सानप यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.