शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाण्यांची क्षमता तपासावी

By admin | Updated: May 28, 2014 21:58 IST

येत्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करताना घरच्या घरी बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी

आकोट: येत्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करताना घरच्या घरी बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन आकोट कृषी विभागाने केले आहे. तालुक्यातील देवरी येथे आयोजित खरीपपूर्व ग्रामसभेत शेकडो शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षस्थानी हरिभाऊ वाघोडे, तर प्रमुख अतिथी पंकज फोकमारे होते. उपविभागीय कृषी अधिकारी अशोक गायकवाड, ताकृअ अशोक माळी, मंडळ कृषी अधिकारी अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकर्‍यांना खरीप हंगाम पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. ७० टक्के उगवणशक्ती आली तरच एकरी ३० किलो बियाणे टाकावे, ५० टक्क्यापर्यंतउगणवशक्ती निघाली तर ४० किलो बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी अधिकार्‍यांनी दिला. सोबतच सोयाबीनच्या शेतात आंतर पिकाचे प्रमाण वाढवावे, बीबीएफ पद्धतीने उताराला आडवी पेरणी करावी, जेणेकरून कमी पावसात पिकांना ओलाव्याचा फायदा होईल. तीन से.मी. पेक्षा खोल पेरणी करू नये. यावेळी उगवणशक्ती कशी तपासावी,याचे सर्व शेतकरी बांधवांसमोर प्रात्यक्षिक करून दाखविले. उगवणशक्ती तीन प्रकारे तपासण्यात येते. वर्तमानपत्र थोडेसे ओले करून त्यावर १०-१० बिया ठेवाव्यात. त्याची गुंडाळी करून प्लास्टिकच्या पिशवीत थंडाव्याच्या ठिकाणी ठेवावे, तसेच गोणपाट ओले करून त्यामध्ये बिया ठेवाव्यात किंवा कुंडीत १०० बिया पेराव्या. ६ ते ७ दिवसात बियाण्याला अंकुर आलेले दिसतील. या प्रसंगी कृषी सहाय्यक करवते, वासुदेव भोई, सुनील राजनकर, कुमावत, सांगोळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. संपूर्ण तालुक्यात गावोगावी उगवणक्षमता तपासणी अभियान राबविल्या जात आहे. शेतकरी बांधवांनी या अभियानाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.