शिर्ला : जलसंधारणाच्या विविध प्रयोगातून उपलब्ध होणाऱ्या शाश्वत पाण्यामुळे शेतकरी करोडपती व्हावा आणि शिर्ला विकासाचे रोल मॉडेल बनावे, असे विचार लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.१५ मार्च रोजी लातूर प्रवासाला निघाले असता जी. श्रीकांत आणि त्यांची पत्नी सोनम यांनी शिर्ला येथे भरउन्हात श्रमदान केले. यावेळी त्यांची मुलगी शाश्वतीच्या नावे वृक्षारोपणासाठी तेथे खड्डा खोदून वटवृक्ष लागवडीची सूचना केली. देशातील सर्व जलसंधारणाचे विविध प्रयोग केलेल्या माळरानाचे जी. श्रीकांत असे नामकरण त्यांच्याच हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. माळरानावरील लिंबाच्या झाडाखाली त्यांना निरोप देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोनम श्रीकांत यांना शिर्लाच्या सरपंच रिना शिरसाट, रेखा गवई आणि इतर महिलांनी रेशमी साडी देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच जी. श्रीकांत यांचा रेशमी सदरा, महाराष्ट्रीयन टोपी आणि शेला देऊन सचिन कोकाटे, प्रकाश अंधारे, संतोषकुमार गवई यांनी गौरव केला. अनिसा पठाण यांनी टिकास, फावडे आणि टोपलीच्या प्रतिकृती भेट दिल्या. जलयुक्त शिवारमुळे शिर्लाच्या झाडांना आलेले गावरान गोड आंबे सुनील अंधारे यांनी भेट दिले.यावेळी भंडारजचे सरपंच दीपक इंगळे, प्रकाश अंधारे, शर्मा यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन कोकाटे यांनी तर आभार संतोषकुमार गवई यांनी मानले. कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुभाष नानोटे, तहसीलदार रामेश्वर पुरी, संजय शिरसाट, सुनील अंधारे, गणेश वसतकार, प्रतिभा वसतकार, गजानन आवटे, प्रवीण इंगळे, मंगेश निमकंडे, तेजराव इंगळे, रेखा गवई, नीलिमा इंगळे, इम्रान पठाण, सलमान पठाण, रघुनाथ बोचरे, स्वप्निल मुळे, शंकर लांडे, किशोर वसतकार, ज्ञानेश्वर वसतकार, संजय खर्डे, नरेंद्र गवई, बाळ भाजीपाले, शुभम अंधारे, शेखर बोचरे, गवई आदींची उपस्थिती होती.
जलसंधारणातून शेतकरी करोडपती व्हावेत - जी. श्रीकांत
By admin | Updated: May 16, 2017 20:16 IST