शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीचा मोबदला अद्याप अंधातरीच

By admin | Updated: November 6, 2014 01:02 IST

महापारेषणच्या अकोला-मूर्तिजापूर विद्युत वाहिनीचे काम पूर्ण; अद्याप शेतजमिनीचा मोबदला नाही.

अकोला : विजेची वाढती मागणी आणि त्यानुसार पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले विद्युत वाहिन्यांचे जाळे यामधून वरकरणी विकासाचे चित्र जरी पुढे येत असले तरी या विकासाचा जबर फटका शेतक र्‍यांना बसला आहे. कवडीमोल पीक नुकसानभरपाई देऊन महापारेषण आणि खासगी कंपन्यांच्या विद्युत वाहिन्यासाठी कृषक जमिनीवर मनोरे उभे केले गेले. मात्र, त्यानंतर शासनाच्या २0१0 मधील अध्यादेशाप्रमाणे देय असलेला मोबदला महापारेषणकडून अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप मिळाला नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. राज्यात महापारेषणच्या उच्चदाब विद्युत वाहिन्या (एचटी लाइन) ४२२५८ किमी लांबीच्या आहेत. या वाहिन्या कृषक आणि ह्यईह्ण क्लास जमिनीवरून गेल्या आहेत. त्यातही कृषक जमिनी जास्त प्रभावित झाल्या आहेत. शेतकर्‍यांच्या शेतातून वीज वाहिनी टाकताना आणि विद्युत मनोर्‍याचे काम करताना होणार्‍या पीकहानीचा १८८५ सालच्या टेलिग्राफ कायद्यातील तरतुदीप्रमाणे तुटपुंजा मोबदला शेतकर्‍यांना दिला जातो. १३२ केव्ही दाबाची विद्युत वाहिनी टाकताना दोन्ही बाजूने अंदाजे २७ मीटर क्षेत्रात पीक नुकसानाची भरपाई शेतकर्‍यांना दिली जाते. ती नगण्य असल्याची ओरड लक्षात घेऊन शासनाने नोव्हेंबर २0१0 मध्ये एक अध्यादेश काढला. त्यानुसार विद्युत वाहिन्यांची उभारणी, देखरेख, दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी पीक नुकसानभरपाई सोबतच प्रभावित जमिनीचा मोबदला देण्याचे ठरले. कोरडवाहू जमिनीसाठी प्रभावित शेतजमिनीच्या २५ टक्के, ओलित जमिनीसाठी ५0 टक्के, बागायती जमिनीसाठी ६५ टक्के मोबदला देण्याचे ठरले. मात्र, त्या अध्यादेशानुसार अकोला जिल्ह्यातील शेतक र्‍यांना मोबदला अद्याप दिला गेला नसल्याचा प्रकार अकोला-मूर्तिजापूर विद्युत वाहिनीच्या माध्यमातून पुढे आला आहे. २00८-0९ मध्ये सुरू झालेल्या अकोला-मूर्तिजापूर १३२ केव्ही विद्युत वाहिनीचे काम यावर्षी मार्च महिन्यात पूर्ण झाले. या वाहिनीचे सर्वंच १५६ विद्युत मनोरे शेतजमिनीवर उभे केले गेले. त्यापैकी शेतकर्‍यांकडून सात-बारा व अन्य बाबींची पूर्तता झालेली ६0 ते ७0 प्रकरणे महापारेषणने अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे ८ मे रोजी पाठविली. त्यात त्रुटी निघाल्याने पुन्हा ७ ऑगस्ट व नंतर ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आलीत. मूल्यांकनाची प्रकरणे एका महिन्यात पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, तेव्हापासून अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमिनीचे मूल्याकंन झाले नाही. परिणामी प्रभावित जमिनीचा मोबदला देणे रखडला आहे.