शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी हटविल्या समृद्धी महामार्गाच्या खुणा!

By admin | Updated: January 20, 2017 02:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे माजी मंत्र्यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

डोणगाव (जि.बुलडाणा), दि. १९- महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे डोणगाव परिसरात सर्वेक्षण करुन खूणा करण्याचे काम सुरु आहे. याविरुद्ध शेतकर्‍यांमध्ये असंतोष असल्याने अखेर १९ जानेवारीला दुपारी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी, शैलेश सावजी यांच्या नेतृत्वात आंधृड येथे शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गाच्या खुणा उपटून सदर महामार्गाला विरोध दर्शविला आहे. मेहकर तालुक्यातील आंधृड येथील शेतकरी माणिकराव देशमुख, उद्धवराव त्र्यंबकराव देशमुख, राजकुमार माधव देशमुख, डिगांबरराव खुशालराव देशमुख, नारायणराव साहेबराव देशमुख, रंगनाथ साहेबराव देशमुख, सतिष उद्धवराव देशमुख, विठ्ठलराव शामराव देशमुख, ज्ञानबाराव शामराव देशमुख, गुणवंतराव देशमुख, दिपक ओंकारराव देशमुख, कडूबा देशमुख, गिरधर देशमुख सह शेतकर्‍यांनी आंधृड शिवारातील माणिकराव देशमुख यांचे शेताजवळ सर्वेक्षण होऊन गाडलेल्या समृद्धी महामार्गाच्या खूणा उपटून टाकल्या व या महामार्गासाठी एक गुंठाही जमिन देणार नाही, अशी नारेबाजी करुन शेतकर्‍यांनी सदर समृद्धी महामार्गाला विरोध केला. डोणगाव परिसरातून सदर समृद्धी महामार्ग जात असल्याने या प्रकल्पात अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. विकासाचा हा महामार्ग शेतकर्‍यांना भूमिहीन करणारा ठरत असल्याने शेतकर्‍यांनी सदर समृद्धी महामार्गाला माजीमंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात खुणा उपलटून विरोध दर्शविला. या अगोदरही माजी मंत्री सुबोध सावजी यांनी शेतकर्‍यांसाठी अकोला जिल्ह्यात विजेचे टावर तोडो आंदोलन करुन शेतकर्‍यांना न्याय दिला होता व आता ऐन आचार संहितेत सावजींनी समृद्धी महामार्गाच्या खुणा उपटून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा खंबीर प्रयत्न चालविला आहे.