शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील शेतकरी पिकविणार गॅस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा ...

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पातूर तालुक्यातील नायगाव येथे कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष दामोदर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सावित्री राठोड, पंचायत समिती सभापती लक्ष्‍मी डाखोरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, पातूर विकास मंचचे शिवकुमार सिंह बायस ठाकूर, तसेच शिलाबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर अर्चना राठोड, शिलाबाई राठोड उपस्थित होत्या. तालुक्यातील नायगाव येथे माळरानावर प्रकल्‍प उभारला जात आहे. या प्रकल्‍पात शेतीतील टाकाऊ कचरा, नेपियर गवत व घरगुती कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधन निर्मितीमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. या ठिकाणी स्वयंपाक, तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती आणण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असल्याचेही कंपनी डायरेक्टर छगन राठोड यांनी सांगितले.

फोटो :

शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्न

सुपीक जमीन असेल तर सेंद्रिय किंवा बायोमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न उदाहरणार्थ हत्ती गवत दोन लाखांपासून चार लाखांपर्यंत प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष. नापीक किंवा पडीक जमीन असेल तर बायोमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष एक लाख रुपये. शेतजमीन नसेलच तर कंपनीच्या पशुपालन, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन व्यवसायात सहभागी होता येईल.

शिलाबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीची उद्दिष्टे

हवेत कार्बन सोडणाऱ्या इंधनाला पर्याय असणाऱ्या जैविक इंधनाची निर्मिती

२०२५ पर्यंत चारचाकी, दुचाकी वाहने सीएनजीवर चालविणे. दर दिवसाला शंभर टन नैसर्गिक वायू आणि १५०, तर नैसर्गिक खताची निर्मिती. सेंद्रिय उत्पादनांची साखळी तयार करणे व युवकांना रोजगार देणे, आदी उद्दिष्टे आहेत.