शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील अर्धनग्न शेतकऱ्यांचा एल्गार!

By संतोष येलकर | Updated: October 13, 2022 19:15 IST

नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले. 

अकोला : परतीच्या पावसात गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाच्या तडाख्यात सोयाबीनच्या शेंगा सडल्याने, पीक नुकसानीचा तातडीने सर्वे करुन, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम व जामठी सर्कलमधील अर्धनग्न शेतकऱ्यांनी एल्गार पुकारित गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. संबंधित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात कुरुम व जामठी बु.सर्कलमधील राजनापूर खिनखिनी, कवठा सोपीनाथ, मारोडा, सैदापूर, चिंचखेड व जामठी बु. या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सतत जोरदार पाऊस बसरत आहे.

त्यामुळे शेतातील सोयाबीनच्या शेंगा सडल्या असून, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने सोयाबीन पिकाची सोंगणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून, मळणी यंत्रदेखिल शेतकरी शेतात नेऊ शकत नाही. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन तयार कसे करणार, या बाबतची चिंताही शेतकऱ्यांना सतावत आहे. परतीच्या पावसात शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांच्या शिवारातील सोयाबीन पीक नुकसानीचे तातडीने सर्वे करण्यात यावे, पीक नुकसानीची सरसकट भरपाइ देण्यात यावी व पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करीत, संबंधित गावांमधील अर्धनग्न शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी संजय सावळे, सचिन सावळे, बाबुराव बाजड, रुपेश कडू, अमोल वडतकर, राजू गवइ, मंगेश कुकडे, गोकुळ बाजड आदी शेतकरी उपस्थित होते.

अर्धनग्न शेतकऱ्यांनी वेधले लक्ष  मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी, कवठा सोपीनाथ, मारोडा, सैदापूर, चिंचखेड, जामठी बु. येथील शेतकऱ्यांनी अंगातील शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेत सोयाबीन पीक नुकयसानीचे सर्वे करण्यात यावे, सरसकट नुकसान भरपाइ द्यावी व पीक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत मागणी केली व मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षकांना सादर केले. अर्धनग्न शेतकऱ्यांच्या या एल्गाराने नागरिकांचे लक्ष वेधले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmers Protestशेतकरी आंदोलन