शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतक-यांची एकाकी झुंज!

By admin | Updated: February 27, 2016 01:36 IST

कुठे गेले शेतकरी नेते, संघटना; कंपन्यांशी हितसंबंध जोपासण्यासाठी शेतक-यांचे आयुष्य पणाला.

अकोला: आर्थिक विवंचना दूर व्हावी, यासाठी शेतकरी एकीकडे पीक पद्धतीत बदल करीत आहेत; तर दुसरीकडे बोगस बियाणे, रोपांच्या माध्यमातून होणारी शेतकर्‍यांची फसवणूक रोखण्याची जबाबदारी असलेली शासकीय यंत्रणा मूग गिळून आहे. आकोट तालुक्यातील वांझोटे केळी रोपेप्रकरणी शेतकरी चार आठवड्यांपासून कृषी विभाग, जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत. न्यायासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटले, थेट पुणे गाठून कृषी आयुक्तांना साकडे घातले; मात्र परिणाम शून्य. या प्रकरणाच्या निमित्ताने शासकीय यंत्रणांचा असंवेनदशील; किंबहुना भ्रष्ट बुरखाच टराटरा फाडला गेला. एवढंच काय, नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेले राजकीय नेते, सामाजिक संघटना, तसेच शेतकरी नेत्यांची या मुद्यावरील चुप्पी बरंच काही सांगून गेली. अशा स्थितीतही एकाकी झुंज देणार्‍या शेतकर्‍यांच्या जिद्दीला सलामच करावा लागेल. आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्‍यांनी बोगस केळी रोपे देऊन त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार कृषी विभागाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली. एरव्ही शेतकर्‍यांच्या मुद्यावर आपण कमालीचे संवेदनशील असल्याचे भासवणार्‍या सर्वच यंत्रणांनी या गंभीर मुद्यावर केवळ कागदी घोडे नाचविले. अनेक प्रकरणांमध्ये पोलीस केवळ दस्तावेज व जुजबी चौकशी करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करतात. शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल, प्रत्येक शेतकर्‍याचे उत्पन्न किती बुडाले याचा तपशील उपलब्ध आहे. बोगस रोपं घेतल्याच्या पावत्याही शेतकर्‍यांकडे आहेत; मात्र शेतकर्‍यांच्या तक्रारीवर वजन नसल्याने गुन्हा तर दाखल होऊच शकला नाही, पण त्यांच्या मदतीसाठी कुणी पुढे येण्याची तसदीही घेतली नाही.एकीकडे शेतकर्‍यांचा जगाचा पोशिंदा म्हणून उल्लेख करायचा आणि दुसरीकडे तो उपेक्षित कसा राहिला, पाय घासून कसा मरेल, अशी परिस्थिती निर्माण करायची, असेच चित्र या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून येते. शासकीय यंत्रणांचे आणि कृषी क्षेत्राशी निगडित काही कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध यापूर्वी अनेक प्रकरणांच्या निमित्ताने उजेडात आले आहेत. हे आर्थिक हितसंबंध एवढे घट्ट आहेत, की त्यासमोर शेतकर्‍यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तरी अधिकार्‍यांना पर्वा नसते. शेतकर्‍यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर शासकीय यंत्रणा, राजकीय तथा शेतकरी नेते व सामाजिक संघटना जेव्हा डोळेझाक करतात, तेव्हा संवेदनशील मन खिन्न व अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती वेळीच बदलली नाही, तर येणार्‍या काळात शेतकरी हातात रुमणे घेऊन रस्त्यावर उतरेल, एवढे मात्र निश्‍चित..!