शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनो, रास्त भावासाठी रस्त्यावर उतरा!

By admin | Updated: October 25, 2016 02:06 IST

भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांचे प्रतिपादन

वाशिम, दि. २४- शेतात राबराब राबूनही शेतमालाला अपेक्षित भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शासनावर विसंबून न राहता शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनीच आता रस्त्यावर उतरावे, असे प्रतिपादन भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.स्थानिक चिखली रोडस्थित स्त्री रुग्णालयानजिकच्या प्रांगणात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसंच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज राठोड, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.दा. भगत, डॉ. नरेश इंगळे, डॉ. रवींद्र मोरे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कष्टकर्‍यांना योग्य न्याय मिळायला हवा; मात्र सध्या या घटकावरच अन्याय सुरू आहे. न्याय हवा असेल, तर सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. या सोहळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायी, भारिप-बमसंचे पदाधिकारी व उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.