शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी शेतकरी हतबल

By admin | Updated: September 28, 2016 01:51 IST

अखेर माहिती अधिकारात मिळाली शासन नियुक्त पीक विमा कंपनीची माहिती.

अकोला, दि. २७- गत तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. विपरीत आर्थिक परिस्थितीला तोंड देत शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी पेरणी केली. जुलै महिन्यात पावसाने शेतकर्‍याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्या प्रदीर्घ उघडीपामुळे सोयाबीनसह अन्य पिकांसाठी शेतकर्‍यांनी पाहलेल्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. अशात पीक विम्याच्या शासनाद्वारे अधिकृत विमा एजन्सीस शोधत शेतकरी असून या विमा कंपनीचा ठावठिकाणाच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे.शेतातील पिकांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना या वर्षी जानेवारी महिन्यातच लागू केली. या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनानाद्वारे १ एप्रिलपासून करण्याचे सूतोवाच केले गेले. या योजनेची अंमलबजावणीदेखील झाली. अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी त्यांच्या कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचा विमादेखील उतवरला; मात्र अद्याप कुठल्या पीक विमा कंपनीद्वारे त्यांचा पीक विमा उतरविला गेला याची साधी माहितीदेखील शेतकर्‍यांना मिळू शकली नाही. अखेर त्रस्त होऊन अकोला येथील प्रा. दिनकर पाटील यांनी पीक विम्यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली. त्यावेळेस त्यांना शासनाद्वारे नियुक्त पीक विमा कंपनीबद्दल कळविण्यात आले. विशेष म्हणजे शासकीय योजनांच्या प्रसारासाठी शासन मोठय़ा प्रमाणात खर्च करीत असताना कुठल्या जिल्ह्यात कुठली विमा कंपनी पीक विम्यासाठी अधिकृत केली आहे, याची साधी माहितीदेखील शेतकर्‍यांपर्यंत पोहचू शकली नाही. एवढेच नाही तर कृषी विभागाच्या वेब पोर्टलवरदेखील शेतकर्‍याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली माहिती उपलब्ध नव्हती. जिल्ह्यात कृषी अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार चालू वर्षाच्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून अकोला जिल्ह्यासाठी शासनाने इफको टोकियो या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीचे कार्यालय टिळक रोडवरील आकाश टॉवर बिल्डिंगमध्ये आयसीआय बँकेवरील दुसर्‍या मजल्यावर आहे.शेतकर्‍यांनी काढलेला पीक विमा कुठल्या विमा कंपनीद्वारे काढण्यात आला, याची माहितीदेखील शेतकर्‍यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे अखेर माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. कृषी अधीक्षक कार्यालयाने ती माहिती उपलब्ध करून दिली; मात्र अद्याप पीक विम्याची तालुकानिहाय माहिती पीक विमा कंपनीच्या वेबसाइडवर टाकली गेली नाही. त्यामुळे ही माहिती विमा कंपनीच्या वेबसाइडवर टाकावी जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या पीक विम्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकेल. - प्रा. दिनकर पाटील, अकोला