शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:45 IST

अकोला : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, नाफेडद्वारे तूर खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारीत शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेचा मोर्चा कर्जमाफीचा शासनाकडे सादर केला प्रस्तावप्रस्तावाचा विचार करा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी उपोषण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, नाफेडद्वारे तूर खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारीत शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नाफेडद्वारे तूर खरेदी व तूर खरेदीची देयके सुरळीत करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. निवेदनात शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या मोर्चात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, सतीश देशमुख, ललित बहाळे, डॉ. श्रीकांत तिडके, प्रशांत गावंडे, अविनाश नाकट, विजय लोडम, विजय मोरे, ज्योत्स्ना बहाळे, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, मनोज तायडे, विजय देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब तायडे, गुलाबराव म्हसाये, लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल्ल बदरके, मोहंमद साजिदभाई, अरविद तायडे, रवींद्र ठाकरे, शरद सरोदे, पंकज वानखडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते व जिल्हय़ातील शेतकरी सहभागी झाले होते.

..तर सत्ताधारी पुढार्‍यांना विचारला जाणार जाब! शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रस्तावावर शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, जेथे-जेथे सत्ताधारी पुढार्‍यांच्या सभा होतील तेथे-तेथे त्यांना संपूर्ण कर्जमाफीबाबत जाब विचारला जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.

प्रस्तावाचा विचार करा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी उपोषण!शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासंदर्भात शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या प्रस्तावावर शासनाने गांभीर्याने विचार करावा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी (शरद जोशी यांची जयंती) राज्यात शेतकरी एक दिवस उपोषण करणार असून, शासनाच्या शेतीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.