शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक विम्यातही शेतक-यांची निराशा

By admin | Updated: February 2, 2016 01:51 IST

दुष्काळात पीक नुकसानभरपाईचा लाभ अत्यल्प.

संतोष येलकर/अकोला: गतवर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकाच्या नुकसानभरपाईपोटी शेतकर्‍यांना देण्यात येत असलेल्या विमा रकमेचा लाभ अत्यल्प असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक विम्यातही शेतकर्‍यांची निराशा झाली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्कळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकरी हवालदिल झाला. गतवर्षीच्या रब्बी हंगामात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी प्रामुख्याने हरभरा, गहू, कांदा व इतर पिकांचा विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम भरून, राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडून शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक नुकसानभरपाईपोटी पीक विमा रकमेचा आधार मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची रक्कम अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विमा कंपनीमार्फत संबंधित बँकांना प्राप्त झाली. अकोला जिल्ह्यात हरभरा पीक विम्यापोटी एकरी ५८१ रुपये ते २ हजार ९५४ रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. महसूल मंडळनिहाय देण्यात येणार्‍या पीक नुकसानभरपाईमध्ये काही तालुक्यांमध्ये पीक विम्याची अत्यल्प रक्कम प्राप्त झाली आहे. अशीच स्थिती विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत हरभरा पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांनी एकरी ३00 रुपये प्रमाणे विमा हप्त्याची रक्कम भरली असून, त्यापोटी एकरी ५८१ रुपये ते २ हजार ९५४ रुपयांपर्यंंत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक विम्यापोटी कमी रकमेचा लाभ मिळल्याने, शेतकर्‍यांची निराशा झाली आहे.