शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार शेततळे !

By admin | Updated: May 1, 2017 03:07 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : ‘मागेल त्याला शेततळे’ उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश

अकोला : जिल्ह्यात १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे आहेत, असा संकल्प करीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय बोलत होते. जिल्ह्यात यावर्षी १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ‘मागेल त्याला शेततळे ’ योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी पांडेय यांनी कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील विविध योजना आणि विकास कामांचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. ‘जलयुक्त शिवार’ची अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण करा!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, अपूर्ण कामे महिनाभराच्या कालावधीत (जून अखेरपर्यंत) पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.तीन लाख शेतकऱ्यांना ‘पीक विम्या’चे कवच देणार!पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत येत्या दोन -तीन महिन्यात जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत समाविष्ट करून, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे कवच देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.