शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संवाद यात्रा उद्या पासून तेल्हार्‍यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:33 IST

तेल्हारा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून ९ सप्टेंबर रोजी  सुरू होणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0, ११ सप्टेंबरला  अकोला जिल्ह्यात येत असून, या अराजकीय यात्रेत  सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  यात्रेचे जिल्हा संयोजक अनिल गावंडे यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून ९ सप्टेंबर रोजी  सुरू होणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0, ११ सप्टेंबरला  अकोला जिल्ह्यात येत असून, या अराजकीय यात्रेत  सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  यात्रेचे जिल्हा संयोजक अनिल गावंडे यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत केले.येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी गावंडे  बोलत होते. १0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता  यात्रेचे तेल्हारा तालुक्यात अडसूळ फाटा येथे आगमन  होत असून, सकाळी ११.३0 दहीगाव, दुपारी १२.४५  थार, २ वाजता गाडेगाव, २.४५ बेलखेड, ४.४५ चि तलवाडी, ५.४५ ला अडगाव बु., सायंकाळी ७ ला  सिरसोली आणि रात्री ९ वाजता अकोट येथे सरपंच  संघटना पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. ११ स प्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता पिंप्री खुर्द, दुपारी १२  बोर्डी, २ वाजता वडगाव मेंढे, २.३0 देऊळगाव, ३  वाजता सावरा आणि दुपारी ४ वाजता आसेगाव बाजार  येथे संवाद यात्रा पोहोचणार आहे, अशी माहिती गावंडे  यांनी दिली. अनिल गावंडे पुढे म्हणाले, की आम्ही  संवाद यात्रेद्वारे विदर्भातील पाच जिल्ह्यांतील किमान  ५0 गावांचे आणि गावकरी लोकांचे प्रश्न समजून  घेणार आहोत आणि यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न  सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रामाणिक प्रयत्न  करणार आहोत, असे ते म्हणाले.  यावेळी  सामाजिक  कार्यकर्ते पुरुषोत्तम आवारे, पत्रकार सुधाकर खुमकर  यांनी शेतकरी संवाद यात्रेत कुणीही हारतुरे आणू नये  आणि कोणतेही राजकीय झेंडे घेऊन सामील होऊ नये,  असे आवाहन केले. पत्रपरिषदेला गजानन बोरोकार,  मनीष भांबुरकर, अशोक घाटे आदी उपस्थित होते.