शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

अतिदुर्गम भागातील शेतक-यांना शेतावर धडे!

By admin | Updated: March 4, 2016 02:04 IST

पीकवाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.

अकोला: अखिल भारतीय समन्वयीत दीर्घ मुदतीय खंत संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने विदर्भात एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पांतर्गत दुर्गम भागातील शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी अतिदुर्गम भागात शेती शाळाही भरवण्यात येत आहेत.आदिवासी उपयाजनेंतर्गत अतिदुर्गम भागातील शेतकरी उत्पादन वाढीसाठी सक्षम व्हावा,या उद्देशाने विदर्भात शेतकर्‍यांच्या शेतावर शेती दिन व इतर कार्यक्रम घेऊन शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. अलिकडची शेतीपुढील आव्हाने बघता, शेतकर्‍यांसाठीच्या योजनांवर अधिक भर देण्यात आला असून, कृषी विद्यापीठामार्फत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. अखिल भारतीय समन्वयीत दीर्घ मुदतीय खत संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने प्रत्यक्ष शेतावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करू न पीक उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी मंगळवारी विदर्भातील इतर भागासह अमरावती जिल्हय़ातील धारणी तालुक्यातील नांदुरी येथे आदिवासी शेतकरी बांधवांना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनासंदर्भात मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डी.बी. तामगाडगे यांनी शेतकर्‍यांना शाश्‍वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. दीर्घ मुदतीय खत संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. डी.व्ही. माळी यांनी दीर्घ मुदतीय खत प्रयोगातील ठळक निष्कर्ष आणि गहू,हरभरा पिकाकरिता खत व्यवस्थापन या विषयावर शेतकर्‍यांना इत्यंभूत माहिती दिली. माती परिक्षण महत्त्वाचे असल्याने डॉ. सचिन नंदापुरे यांनी माती परिक्षणाचे महत्त्व व मातीचा नमुना घेण्याची पद्धत याविषयी शेतकर्‍यांना माहिती दिली. ए.बी. आगे यांनी पीक एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. शेतावरील शेती दिन कार्यक्रमाला गावकरी लालजी तांडीलकर, छगन खडके, मंगल तांडलीकर आदींसह आदिवासी शेतकर्‍यांची उपस्थिती लक्षणिय होती.