शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेची सेंट्रल बँकेत धडक

By admin | Updated: July 3, 2017 01:52 IST

कर्ज पुरवठ्यास दिरंगाईचा विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या अकोट तालुक्यातील अडगाव येथील शाखेत शेतकऱ्यांना सिंचनाकरिता कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याच्या व शेतकऱ्यांना योग्य वागणूक दिल्या जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बँकेचे प्रादेशिक कार्यालय गाठले. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येऊन शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले. अडगाव बु. येथील काही शेतकऱ्यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा अडगाव बु.ला ठिबक सिंचनाकरिता कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी ९ डिसेंबर २०१६ ला आवश्यक कागदपत्रांचा पुरवठा केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषी अधिकारी रूपाली खारोडे आणि बँकेचे मुख्य अधिकारी नवनीत कुमार यांनी पत्र दिले. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी २२ मार्च २०१७ ला आपली जमीन बँककडे गहाण दिली. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना रोज नवीन कारणे देऊन उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. चार महिने बँकेचे उंबरठे झिजवावे लागल्यानंतरही कर्ज मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे तक्रार दाखल केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत या शेतकऱ्यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे प्रादेशिक कार्यालय गाठले व झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर प्रादेशिक अधिकारी सिन्हा यांनी झालेला प्रकार चुकीचा असल्याचे कबूल करीत सदर शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सतीश देशमुख, प्रशांत गावंडे, जिल्हा युवा आघाडी प्रमुख अविनाश नाकट, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, अकोट युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्र्रे, गोपाल निमकर्डे, अमोल मसुरकार, गणेश बहाकर, प्रशांत बहाकर, जाफरखा, आमदखा, साजिदखा वलायत खा, मुजाईद हुसेन, जफर हुसेन, प्रशांत देशमुख व सुरेश सोनोने आदी उपस्थित होते.