शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकरी बेहाल

By admin | Updated: July 4, 2014 00:44 IST

जुलै महिना उजाडला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

अकोला: जुलै महिना उजाडला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीचे फेरनियोजन करण्याची पाळी आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फेरपेरणीचे आपत्कालीन नियोजन केले आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस आलाच नाही, तर मात्र कपाशी पेरणीचेदेखील फेरनियोजन करावे लागणार आहे. खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, तूर, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; परंतु यंदा जून संपला आणि जुलै महिना लागला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने या कृषी विद्यापीठाने जुलै महिन्याचे पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक होते; तथापि पाऊस नसल्यामुळे मूग, उडीदाची सलग पेरणी आता शक्य नाही. एवढय़ात पाऊस आला तरच आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल; मात्र त्यासाठी २0 टक्के बियाणे जास्त वापरावे लागणार आहे. कापूस पेरणी करण्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीन उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी लवकर परिपक्व होणारा अमेरिकन अथवा देशी कापूस उपयुक्त ठरणार आहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा, तसेच संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रावर कापूस: ज्वारी: तूर: ज्वारी (६:१:१:१) किंवा (३:१:१) त्रिस्तरीय कापूस अधिक तूर अशा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.सलग सोयाबीन पिकासाठी शिफारशीप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन आणि तूर आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकर्‍यांना फायदा होतो. सलग ज्वारी पिकासाठी शिफारशीसह ज्वारी अधिक तूर (३:३) आंतरपीक पद्धतीमुळे फायदा होतो. २0 ते २५ टक्के बियाणे जास्त वापरावे, तूर शिफारशीप्रमाणे लागवड करावी, कापूस अधिक तूर (६:२) किंवा सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक घ्यावे. मूग, उडीद पिके ही उथळ काळ्य़ा जमिनीत लावावी, मका शिफारशीप्रमाणे लागवड करावा, तर धानाची शिफारशीप्रमाणे रोवणी करावी, असा सल्ला विद्यापिठाने दिला आहे.