शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना कृषि अधिकारी व सहायकास पकडले

By admin | Updated: April 8, 2016 02:06 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; १५ हजाराची लाच स्वीकारताना अटक.

बुलडाणा : एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारताना मलकापूर तालुका कृषी अधिकारी व कृषि सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रंगेहाथ पकडले. चिखली येथील रहिवासी नवृत्ती विठ्ठल जाधव यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय तथा वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेच्या माध्यमातून उपजिविका प्रशिक्षण कार्यक्रम मलकापूर येथे घेतला. हा प्रशिक्षण कार्यक्रम २४ मार्च रोजी पूर्ण करण्यात आला. या प्रशिक्षणाचे १ लाख ८७ हजार ५00 रूपयांचे देयक मंजुरीसासठी संबंधित विभागातर्फे पाठविण्यात आले. या देयकाच्या मंजुरीसाठी मलकापूर तालुक्याचे कृषि अधिकारी विजय खोंदील याची स्वाक्षरी आवश्यक होती; मात्र त्यांनी यासाठी २0 हजार रूपयांची मागणी केली. लाचेची रक्कम जास्त असल्यामुळे फिर्यादी नवृत्ती जाधव यांनी १५ हजार रूपये देण्याचे कबुल केले. ही रक्कम तालुका कृषि अधिकारी विजय लक्ष्मण खोंदील (वय ४५) याने त्याचा कृषि सहायक नागेश सुधाकर डुकरे (वय ४0) याच्याजवळ जमा करण्यास सूचविले. ही रक्कम गुरूवारी बैठकीनंतर देण्याचे ठरले. गुरूवारी बुलडाणा येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृषि उपविभागीय कार्यालय परिसरात सापळा रचला. बैठकीनंतर दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली. यावेळी फियादीकडून १५ हजाराची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.