शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून कबुली!

By admin | Updated: March 18, 2016 02:13 IST

आमदारांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर; तपास प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती.

अकोला : केळीचे निकृष्ट व बोगस बियाणे देऊन आकोट तालुक्यातील केळी उत्पादकांची फसवणूक करण्यात आली असून, यात शेतकर्‍यांचे ७0 टक्के नुकसान झाले असल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. आमदार रणधीर सावरकर आणि आ. प्रकाश भारसाकळे यांच्यासह आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषिमंत्र्यांनी केळी उत्पादकांच्या नुकसानाची कबुली दिली.आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्‍यांनी जून ते जुलै २0१५ दरम्यान केळी पिकाची लागवड केली. सदर बियाणे रमेश रामचंद्र आकोटकर यांच्यासह दोघांच्या गणराज केला ग्रुप या दुकानातून घेतले. इंद्रायणी जातीचे बियाणे मिळण्यासाठी त्यांनी आगाऊ बुकिंग केले होते; मात्र इंद्रायणी जातीचे बुकिंग केल्याची पावती असताना दुसर्‍याच कंपनीचे बेणे पुरविण्यात आले. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला पूर्वचे आमदर रणधीर सावरकर आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शेतकर्‍यांना केळीची निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविण्यात आल्याने त्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तालुकास्तरीय निवारण समितीच्या अहवालात नमूद असल्याचे कृषिमंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, तपास प्रगतीपथावर असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.