शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या लाभाविना शेतकरी वा-यावर!

By admin | Updated: May 3, 2016 02:17 IST

खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकोला जिल्हय़ातील साडेतीन लाखावर शेतक-यांना पीक विम्याची प्रतीक्षा.

संतोष येलकर /अकोलाराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्‍यांना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेला शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित असताना पीक विम्याच्या लाभाविनाही वार्‍यावर आहे. त्यामुळे पीक विम्याच्या रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकर्‍यांनी १५ कोटी १५ लाख २८ हजार रुपयांची रक्कम राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडे जमा केली. ना िपकीमुळे जवळ पैसा नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला असून, येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत दुष्काळी मदत अद्याप प्राप्त झाली नाही. शासनाच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांकडून पीक विमा रकमेचा लाभदेखील अद्याप मिळाला नाही. यावर्षीचा पावसाळा वेळेवर सुरू होण्याचा अंदाज हवामान वेधशाळांनी वर्तविला आहे. त्यानुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे.