शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात जनावरांना कवडीमोल भाव

By admin | Updated: April 11, 2016 01:34 IST

पाणी नाही, चारा नाही : जनावरे जगविण्याची शेतक-यांना चिंता.

संतोष येलकर/अकोलादुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चारा नसल्याने जनावरे जगविणार कशी, याबाबतची चिंता जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सतावत आहे. टंचाईच्या परिस्थितीत जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाही; मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावाने ती विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली.जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. अत्यल्प पावसामुळे नदी-नाले आटले असून, धरणांमध्येही अत्यल्प जलसाठा आहे तसेच नापिकीमुळे चारा उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत पाणी व चार्‍याच्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, जनावरांना जगविण्यासाठी पाणी आणि चारा कोठून आणणार, असा प्रश्न गावागावांतील शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात लहान व मोठी ३१७१0५ जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदींचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चारा उपलब्ध नाही. चार्‍याचे भाव गगनाला भिडल्याने, जनावरांना जगविणार कसे, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. या पृष्ठभूमीवर जनावरे विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, सांगळूद, चोहोट्टाबाजार, मूर्तिजापूर, वाडेगाव, सिंदखेड, बाश्रीटाकळी, चान्नी, हातगाव आदी ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी येणार्‍या जनावरांची संख्या वाढली आहे. बाजारात आणलेल्या पशुधनाला दुष्काळी परिस्थितीमुळे मागणी नसल्याने, मिळेल त्या भावात पशुधन विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.