शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:56 IST

अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना झाले आहेत.

ठळक मुद्दे तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केली, त्या द्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल याला न देता हडप केली. मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार दिली; परंतु चौकशी झाली नाही.

अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना झाले आहेत.गोपाल अग्रवाल मध्यवर्ती बस स्थानकासमोर विविध प्रकाशित वृत्तपत्रे विक्री करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. याला जोड म्हणून त्यांनी मागील वर्षी मित्रांसोबत ठेक्याने भाड्याची शेती केली होती. त्यामध्ये आलेले तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केली, त्या द्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल याला न देता हडप केली. ती रक्कम मागणी केली असता, पूर्वीच्या मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावर जुने शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हिरासिंग आडे यांनी थातूरमातूर चौकशी करीत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार दिली; परंतु चौकशी झाली नाही. म्हणून गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबारात न्याय मागितला. मात्र, न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर १५ आॅगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर आत्मदहन करणार असल्याचे पत्र पंतप्रधानांना दिले असून, त्यानुसार आत्मदहन करण्यासाठी अग्रवाल कुटुंबीय दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाRed Fortलाल किल्लाNew Delhiनवी दिल्ली