शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या आत्महत्येचा बनाव; गळा आवळून खून केल्याचे उघडकीस!

By सचिन राऊत | Updated: September 1, 2023 19:57 IST

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.

अकोला : पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द येथे एका ३६ वर्षीय युवकाच्या आत्महत्येचा बनाव केला होता; परंतु मृतकाची पत्नी व पोलिसांच्या सतर्कतेने बनाव उघडकीस आला असून, शवविच्छेदन अहवालात युवकाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली.

पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द येथील मिलिंद तुळशीराम इंगळे (३६) यांनी बुधवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरी रिसोड येथे गेलेल्या त्यांच्या पत्नीला कळविण्यात आली. मृतकाची पत्नी परतल्यानंतर तिला संशय आला. त्यामुळे तिने पातूर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठले. मात्र, ती गावात पोहोचण्याच्या आधीच मृतकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंब व गावातील लोकांनी केली; परंतु अंत्यसंस्काराच्या वेळेवर बुधवारी सायंकाळी मृतकाची पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचल्याने अंत्यसंस्कार रोखण्यात आले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मिलिंद इंगळे यांनी आत्महत्या केली नसून त्यांना मारहाण करून गळा आवळून खून केला व फासावर लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला, ही बाब स्पष्ट झाली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार किशोर शेळके, पोलिस उपनिरीक्षक मीरा सोनुने, गजानन मानकर, दिलीप इंगळे, संबोध इंगळे, सत्यजित ठाकूर, नीलेश राठोड यांनी केली.

टॅग्स :Akolaअकोला