शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

५00 रुपयांत बनावट बायको

By admin | Updated: December 29, 2015 02:23 IST

किडनी तस्करी प्रकरण; कोल्हटकरच्या पत्नीचा बनाव करण्यासाठी दिले ५00 रुपये.

अकोला - किडनी तस्करी प्रकरणामध्ये आणखी एक मनोरंजक व फसवणुकीचा अजबगजब किस्सा समोर आला आहे. देवेंद्र शिरसाट या आरोपीने पीडित संतोष कोल्हटकरच्या खर्‍या पत्नीऐवजी ज्या महिलेला पत्नीचा बनाव करायला लावले, तिला मोबदल्यात ५00 रुपये देण्यात आल्याचे समोर आले. किडनी तस्करी प्रकरणामधील पीडित अमर शिरसाट व किडनी खरेदी करणारा जुने शहरातील रहिवासी संतोष कोल्हटकर, संतोष गवळी व शांताबाई खरात यांची किडनी काढून त्यांना मोबदल्यात तुटपुंजी रक्कम देऊन फसवणूक करण्यात आली होती. या फसवणुकीची तक्रार तिघांनीही पोलीस ठाण्यात केल्यानंतर तसेच ह्यलोकमतह्णने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने किडनी तस्करांच्या मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी, देवेंद्र शिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर किडनी तस्करी प्रकरणामध्ये प्रत्येक स्तरावर वापरण्यात आलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. किडनी तस्करीसाठी संतोष कोल्हटकर याची किडनी काढण्यापूर्वी त्याच्या पत्नीचे संमतिपत्र बनविण्यासाठी दुसर्‍याच महिलेला कोल्हटकरची पत्नी म्हणून ५00 रुपयांच्या मोबदल्यात उभे करण्यात आले होते. हा प्रकार सोमवारी उजेडात आला. दरम्यान, सदर महिलेचे बनावट मतदान कार्ड बनविणारा प्रशिक वानखडे याला स्थानिक गुन्हे शाखेने न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. किडनी तस्करी प्रकरणातील तीन आरोपी कारागृहात असून, एक आरोपी ३0 डिसेंबरपर्यंंंत पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणातील डॉक्टरांची नावे समोर आली आहेत; मात्र वरिष्ठ स्तरावरून पोलिसांवर दबाव येत असल्याने सदर डॉक्टरांना अटक करण्यास अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.