शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बनावट गुंठेवारी प्रकरण; सहाय्यक नगर रचनाकारांचे बयाण

By admin | Updated: May 10, 2014 23:30 IST

प्रस्तावावरील स्वाक्षरी बनावट

अकोला : महापालिकेतील नगर रचना विभाग व उपविभागीय कार्यालयातून तयार करण्यात आलेल्या बनावट गुंठेवारी प्रस्तावप्रकरणी मनपाचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक नगर रचनाकार आर.एन. साबळे यांचे बयाण शुक्रवारी रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी नोंदवले. प्रस्तावावरील स्वाक्षरी बनावट असल्याची माहिती साबळे यांनी पोलिसांना दिली.वाशिम बायपास परिसरातील शेत सर्व्हे नं.४२/१ मधील तीन एकर जागेचा गुंठेवारी प्रस्ताव बनावट असल्याची तक्रार भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली होती. पूर्वाश्रमीच्या शेतमालक पुष्पाबाई वसंतराव औतकर तर्फे गोविंद शंकरलाल बजाज यांच्या नावाने गुंठेवारीचा प्रस्ताव मनपाच्या परवानगीशिवाय मंजूर झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. सदर प्रस्ताव नगर रचना विभागाकडे सादर केल्यानंतर दुसरीकडे या प्रस्तावाला उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळाल्याने दोन्ही शासकीय कार्यालयांची फसवणूक झाली. मनपाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, त्या कालावधीत मनपाच्या नगर रचना विभागाचा प्रभार सहाय्यक नगर रचनाकार आर. एन. साबळे यांच्याकडे होता. प्रस्तावावर आर.एन. साबळे यांच्यादेखील स्वाक्षरी असल्याने यासंदर्भात प्रभारी सहाय्यक नगर रचनाकार साबळे यांच्यासह पूर्वाश्रमीच्या शेतमालक पुष्पाबाई औतकर यांना लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. यावर तत्कालीन सहाय्यक नगर रचनाकार आर.एन. साबळे यांनी मंजूर प्रस्तावावरील त्यांच्या स्वाक्षरी बनावट असल्याचे मनपाकडे नमूद केले. या प्रकरणी मनपाकडून सिटी कोतवाली पोलिसात फौजदारी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये प्रस्तावावर मनपाचे तत्कालीन सहाय्यक नगर रचनाकार आर.एन.साबळे यांच्या स्वाक्षरी असल्याने त्यांचे बयाण नोंदवण्यात आले. यावेळी प्रस्तावावरील सर्व स्वाक्षरी बनावट असल्याची माहिती साबळे यांनी पोलिसांना दिली.