अकोला, दि. २२- संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटचा विद्यार्थी मो. फैसल मोहम्मद शेख याने महानगरक्षेत्र जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धेतील लांब उडी या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. फैसलने १४ वर्षांखालील गटात खेळ प्रदर्शन करून हे यश मिळविले. यवतमाळ येथे होणार्या विभागीय स्पर्धेकरिता फैसल पात्र ठरला आहे. फैसलला क्रीडा शिक्षक संतोष गायगोये यांचे मार्गदर्शन लाभले. शाळाध्यक्ष गोकुलचंद शर्मा, कमलकिशोर हरितवाल, महेंद्र जोशी, जगदिश व्यास, मारवाल सर, मुख्याध्यापक अरुणकुमार गट्टाणी यांनी कौतुक केले.
फैसल शेख विभागीय पातळीवर
By admin | Updated: October 23, 2016 02:08 IST