शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बंदीच्या बेड्यांनंतरही गुटख्याच्या व्यसनाला ‘वेसन’ घालण्यात अपयश!

By admin | Updated: December 19, 2014 01:47 IST

लोकमत सर्वेक्षण;गुटखा बंदीचा परिणाम शून्य; बंदीनंतर दर वाढूनही विक्री आलेख कायम.

अकोला- राज्यात दीड वर्षांपूर्वी गुटखा विक्रीला बंदी करण्यात आली. विक्रीवर बंदी लादली असली तरी उत्पादनावर कोणतेही बंधने नसल्याने अकोला शहराच्या कानाकोपर्‍यात गुटखा पुडी सहज उपलब्ध होते. बंदीपूर्वी एक पुडी घेऊन गुटखा खाणार्‍या युवकांना आता एका वेळी तीन-तीन पुड्या विकत घ्याव्या लागतात. साहजिकच खिश्यात गुटखा पुड्या असल्याने वाटेल तेव्हा ती फाडून तोंडा टाकण्याची सवयही वाढली आहे. एकूणच बंदीपूर्वी गुटखा खाणार्‍यांची संख्या अधिक असली तरी बंदीनंतर ती कमी होईल, हा शासनाचा उद्देश पूर्ण झालेला नसल्याचे ह्यलोकमतह्णने तरूण आणि प्रौढ वर्गातील निवडक व्यक्तींचा सर्व्हे केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. गुटा विक्री करणार्‍यांसोबतच तरूण आणि प्रौढ व्यक्तींसोबत गुटखा खाण्याच्या सवयीवर केलेल्या चर्चेतून आणि काही निवड प्रश्नांची उत्तरे नोंदवून काढलेल्या निष्कर्षानुसार गुटखा बंदीपूर्वी जेव्हा खाण्याची तलब आली तेव्हाच पुडी विकत घेऊन खाण्याची सवय असणारे ५0 टक्क्यांपेक्षा अधिक तरूण आणि प्रौढ होते. आता मात्र हेच तरूण दिवसभर पुरेल एवढय़ा गुटखा पुड्या एकाच वेळी विकत घेतात. खिश्यात पुड्या राहत असल्यामुळे कुठेही असो, पुडी विकत घेण्यासाठी जावे लागत नाही. त्यामुळे वाट्टेल तेव्हा ती खाण्याची सवय जडली असल्याचे अनेकांनी सांगितले. दिवसभरासाठी एकाच वेळी पुड्या घेणार्‍यांची संख्या ५५ टक्के आहे. गुटखा खाण्याची आठवण आल्यानंतर पाणटपरीवर जाऊन गुटखा विकत घेणार्‍यांची संख्या २७ टक्के असून मित्रांसोबत किंवा इतर कोणत्याही कारणाने घर किंवा कार्यालयातून बाहेर पडणाल्यानंतर पान टपरीवर जाऊन गुटखा पुडी विकत घेऊन खाणार्‍यांची संख्या १८ टक्के आहे. गुटखा पुडी विकत घेण्यासाठी कितीही रकम देण्याची तयारी व्यसनाधिन झालेल्यांची असते. याबाबत विचारणा केली असता बंदीनंतर माहगड्या गुटखा पुडी घेण्याची तयारी असल्याचे ६७ टक्के लोकांनी सांगितले. बंदीनंतर गुटखा सहज मिळत नसल्याने पुडीतील गुटख्या ऐवजी तंबाखुमध्ये चोळलेल्या सुपारीचा गुटखा खाणे सुरू केले असल्याचे २२ टक्के लोकांनी सांगितले. ११ टक्के लोकांनी गुटखा खाणे बंद केले असून त्यांनी तंबाखूवर तलब भागविणे सुरू केल आहे. बंदीनंतर गुटखा खाणे बंद करणे किंवा तंबाखुजन्य पदार्थांपासून परावृत्त झालेल्यांची संख्या नगण्य आहे.