शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवराचे संवर्धन करण्यात शासनाला अपयश

By admin | Updated: August 13, 2015 00:21 IST

हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांनी वेधले सरोवर परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे संवर्धन करण्यात शासनाला अपयश येत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिवाणी अर्ज सादर करून लोणार सरोवराशी संबंधित विविध समस्यांकडे लक्ष वेधले. सुधाकर बुगदाने, कीर्ती निपाणकर व गोविंद खेकाळे यांनी लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या अर्जातील तक्रारी लक्षात घेता शासनाला दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले असले तरी, त्यावर काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही. लोणार सरोवराची आजही योग्य देखभाल केली जात नाही. सांडपाणी मिसळणे सुरूच असल्यामुळे सरोवरातील स्वच्छ पाणी घाण झाले आहे. सरोवरातील गोड पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत होते. आता हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. यासंदर्भात शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून उपाय शोधणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाने ही जबाबदारी हैदराबाद येथील नॅशनल जिऑग्राफिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला दिली होती. या संस्थेने गंभीरतेने कार्य केले नाही. २ मे २0१५ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चाच झाली नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. सरोवराच्या काठापासून ५00 मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. असे असतानाही लोणार नगर परिषदेने २00 मीटर अंतरावर पाणी टाकीचे बांधकाम सुरू केले होते. लोणार पर्यटन विकास समितीने १ जून २00२ रोजी प्रस्ताव पारित करून सरोवरापासून ५00 मीटरचा परिसर संरक्षित केला आहे. भारतीय पुरातत्व विभाग सरोवरातील १५ स्मारकांची देखभाल करीत असले तरी स्मारकांच्या जवळ अतिक्रमण व अवैध बांधकाम करण्यात आले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अँड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

* समस्या कायमच

         बाहेरच्या पाण्यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी येथील ह्यसासू सुनेची विहीरह्ण दिसत नाही. लोणार सरोवराच्या उतारावर सर्वत्र काटेरी गवत वाढले आहे. या समस्येवर प्रभावी उपाय करण्यात आलेले नाहीत. सरोवराच्या संवर्धनासाठी शासनाने आवश्यक कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. जड वाहनांच्या अवागमनामुळे सरोवर परिसरात भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे.