शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरची लव्हस्टोरी; प्रियकर-प्रेयसीचे पलायन!

By admin | Updated: April 28, 2017 01:53 IST

अकोला: फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रेमात पडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत, अशी एक घटना गुरुवारी उघडकीस आली.

अकोला: फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रेमात पडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत, अशी एक घटना गुरुवारी उघडकीस आली. फेसबुकवर चॅटिंग करताना एक अल्पवयीन मुलगी जयपूर येथील एका युवकाच्या प्रेमात पडली. त्यांची लव्हस्टोरी बहरत गेली आणि दोघांनी २५ एप्रिल रोजी पलायन केले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रेमाला वयाचे बंधन नसते. ते कधी आणि कोठेही होऊ शकते. फेसबुक चॅटिंग करताना तेल्हारा येथील एक अल्पवयीन मुलगी एका युवकाच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेम बहरत गेले. प्रेमात दोघांनी सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या. युवकही जयपूर येथून अधूनमधून अकोल्यात यायला लागला. भेटी-गाठी होऊ लागल्या. दरम्यान, जयपूर येथील युवकाने अकोल्यात एकेठिकाणी शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्यामुळे दोघांच्याही भेटी-गाठी नियमित होऊ लागल्या. २५ एप्रिल रोजी प्रियकर व प्रेयसी दोघेही आकाशवाणीजवळून जयपूरला पळून गेले. दोन दिवस उलटूनही मुलगी घरी परतली नाही किंवा संपर्क नाही, म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अज्ञात युवकाने त्यांच्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, युवकासह मुलगी जयपूरला गेली. युवकाचे वडील पोलीस खात्यात असल्याने, त्यांना मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी मुलीला अकोल्यात परत पाठविण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत मुलगी अकोल्यात दाखल झाली नव्हती. मुलगी अकोल्यात आल्यावर तिला पालकांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.